शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

फालतू तक्रार करणाऱ्याने उद्धव ठाकरेंना २ लाख द्यावेत, औरंगाबाद खंडपीठाचे डॉक्टरला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 10:56 IST

Court News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करणाऱ्या डॉक्टरला औरंगाबाद खंडपीठाने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

- डॉ. खुशालचंद बाहेती  छत्रपती संभाजीनगर - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करणाऱ्या डॉक्टरला औरंगाबाद खंडपीठाने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

बंजारा समाजाचे महंत उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. महंतांनी ठाकरेंना प्रसाद आणि विभूती दिली.  ठाकरे यांनी प्रसाद आणि विभूती स्वीकारल्यानंतर ती शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीकडे दिली. यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नांदेडमधील डॉ. मोहन उत्तमराव चव्हाण यांनी प्रथमवर्ग, न्यायदंडाधिकारी नांदेड यांच्या न्यायालयात केली. न्यायालयाने ही तक्रार फेटाळली. सत्र न्यायालयानेही याविरुद्धचे अपील फेटाळले म्हणून चव्हाण यांनी ॲड. एस.पी. सलगर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. शासनातर्फे सहायक लोकअभियोक्ता प्रीती डिग्गीकर यांनी बाजू मांडल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांनी निरीक्षण नोंदवले की, ज्याला कायद्याची थोडीशी माहिती आहे, ती प्रत्येक व्यक्ती याला कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग म्हणेल. हा प्रसिद्धी मिळवण्यासाठी न्यायव्यवस्थेचा केलेला वापर  आहे. 

याचिकादाराच्या आरोपांना आधार नाही- उच्च न्यायालयाने दोन लाखांचा खर्च लावून याचिका फेटाळण्याचे सूतोवाच केल्यानंतर चव्हाण यांनी याचिका मागे घेत असल्याचे सांगितले.- न्यायालयाने मात्र माजी मुख्यमंत्र्यांवरील आरोपांना कुठलाही आधार नाही.- याचिका मागे घेण्यास परवानगी देताना चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना तीन आठवड्यांत डिमांड ड्राफ्टने दोन लाख रुपये द्यावेत, असे आदेश दिले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAurangabadऔरंगाबादCourtन्यायालय