शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 07:59 IST

श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली असून, इंडिगोचे हे विमान महाराष्ट्रातील ८३ प्रवाशांना घेऊन मुंबईत येईल.

Jammu Kashmir Attack: जम्मू-काश्मिरातील पहलगाम इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना श्रीनगरहून मुंबईकडे घेऊन येणाऱ्या पहिल्या विमानातील पर्यटकांची यादी अंतिम करण्यात आली असून यात ८३ प्रवासी गुरुवारी महाराष्ट्रात परत येणार आहेत. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जम्मू-काश्मीर इथं अडकलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिल्यानंतर आज श्रीनगर येथून मुंबईसाठी विशेष विमानाची व्यवस्था झाली असून, इंडिगोचे हे विमान महाराष्ट्रातील ८३ प्रवाशांना घेऊन मुंबईत येईल. या प्रवाशांमध्ये कोणा-कोणाचा समावेश असणार आहे, याबाबतची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये शेअर केली आहे.

महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी आणखी एका विमानाचीही व्यवस्था करण्याचा प्रयत्न होत असून, त्यासाठीच्या प्रवाशांची यादी सुद्धा तयार करण्यात येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करत आहेत. या विशेष विमानाचा खर्च राज्य शासन करणार आहे, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पर्यटकांना सुरक्षित घरी पोहचण्यासाठी सर्व विमान कंपन्यांशी बोलणे सुरू अशी माहितीही मोहोळ यांनी दिली.

दरम्यान, आज  पहाटे ३.३० वाजता जम्मू-काश्मीरमधून मुंबई विमानतळावर Star Airlines VTGSI ने  काही पर्यटक सुखरूप पोहचले आहेत. 

महाराष्ट्रातील किती प्रवासी अडकले?

काश्मीरच्या पहलगामजवळील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन व्हॅली येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पर्यटकांना हॉटेलमध्ये थांबविण्यात आले आहे. विमान व रेल्वेच्या तिकीट बुकिंगनुसार पर्यटकांना सोडले जात आहे. काश्मीरला महाराष्ट्र आणि गुजरातमधून सर्वाधिक पर्यटक भेट देतात. सध्या तेथे दोन्ही राज्यांतील सुमारे २० हजार पर्यटक असल्याची माहिती महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर्स असोसिएशनने (एमटीओए) दिली.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर