रविवारी जाहीर झालेल्या राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. मात्र या निकालांमध्ये काँग्रेसने तुलनेने चांगली कामगिरी केली आहे. तसेच विदर्भात लक्षणीय यश मिळवलं आहे. या निकालांनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करतानाच कार्यकर्त्यांचा हुरुप वाढवणारं विधान केलं आहे.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सत्तेचा माज, पैशांची उधळण आणि प्रशासनाचा गैरवापर, या सगळ्या अडथळ्यांवर मात करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका–नगरपंचायत निवडणुकांत विचारधारेच्या ताकदीवर लढा दिला. कोणतीही आर्थिक रसद नसताना, केवळ लोकशाही मूल्यांवर ठाम विश्वास ठेवून उभा राहिलेला हा संघर्ष होता.
या निवडणुकांत काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर जनतेचा स्पष्ट संदेश आहे, पैशांपेक्षा विश्वास मोठा असतो आणि सत्तेपेक्षा विचार महत्त्वाचा असतो. या संघर्षात साथ देणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे, प्रत्येक कार्यकर्त्याचे मनापासून अभिनंदन. काँग्रेसवर विश्वास दाखवणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेचे मी मनःपूर्वक आभार मानतो. महाभ्रष्ट महायुतीपासून महाराष्ट्र वाचविण्याचा लढा अखंडपणे सुरूच राहील, असं सूचक विधानही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केलं.
Web Summary : Despite setbacks for Mahavikas Aghadi, Congress saw relative success in recent elections. Harshvardhan Sapkal highlighted the party's wins, emphasizing the power of ideology over money and power, thanking workers and voters for their support in Maharashtra.
Web Summary : महाविकास अघाड़ी के झटकों के बावजूद, कांग्रेस ने हाल के चुनावों में अपेक्षाकृत सफलता देखी। हर्षवर्धन सपकाल ने पार्टी की जीत पर प्रकाश डालते हुए पैसे और सत्ता पर विचारधारा की शक्ति पर जोर दिया, कार्यकर्ताओं और मतदाताओं को उनके समर्थन के लिए धन्यवाद दिया।