शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

जागावाटपाची चर्चा लटकली; अजित पवार गटात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 06:08 IST

लोकसभेला त्याग केला; विधानसभेला ते नकोच : नेत्यांचा अजित पवारांवर दबाव

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा महायुतीमध्ये सुरू होत नसल्याने अजित पवार गटात कमालीची अस्वस्थता आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या जागावाटपाचा घोळ घातला गेला तर त्याचा फटका महायुतीला बसेल असे या गटाला वाटते. जागावाटप लगेच ठरले नाही तर आपले काही आमदार हे शरद पवार यांच्यासोबत जातील, असे शंकेचे वातावरणही या गटात आहे. जागावाटप चर्चा लगेच सुरू करणार असे भाजप नेते सांगतात. भाजपच्या कोअर कमिटीची गेल्या आठवड्यात बैठक झाल्यानंतर तेच सांगण्यात आले. मात्र, अद्याप भाजपकडून शिंदेसेना वा अजित पवार गटाला कल्पना देण्यात आलेली नाही. 

देवेंद्र फडणवीस यांच्याशी ‘ट्युनिंग’ चांगले...अजित पवार गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला सांगितले की, जागावाटपाच्या दृष्टीने जो समन्वय सुरू व्हायला हवा होता तो अजूनही दिसत नाही. नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असे गृहित धरले तरी निदान जागावाटपाची चर्चा तरी लगेच सुरू व्हायला हवी. या नेत्याने अशीही भावना बोलून दाखविली, की ही चर्चा सुरू करण्याची आमची अपेक्षा ही भाजप आणि विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच आहे. आमचे त्यांच्याशी ‘ट्युनिंग’ चांगले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा पक्ष आमच्याप्रमाणेच भाजपचा मित्र आहे, त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी आमची अपेक्षा नाही. 

कोणत्या जागा मिळणार याची खात्री द्यायला हवी...आमच्याकडे जे आमदार आहेत त्यांचे मतदारसंघ आमच्याकडेच राहतील असे गृहित धरून आम्ही काम सुरू केले आहे पण जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करून त्याबाबतची खात्री आम्हाला द्यायला हवी. तसेच, आमदार नसलेले कोणते मतदारसंघ आपल्याला मिळणार हे लगेच स्पष्ट झाले तर त्या मतदारसंघांवर फोकस करणे सोपे जाईल, अशी भावनाही या ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखविली.

दरवेळी आपणच त्याग का करायचा?आपल्या गटाचे आणि अपक्ष मिळून अजित पवार यांच्याकडे ४५ हून अधिक आमदार आहेत.शिंदेंसेनेच्या तुलनेत आमच्याकडे आमदार फार कमी नाहीत, त्यामुळे जागावाटपात शिंदेंइतक्याच जागा मिळाव्यात यासाठी अजित पवार यांच्यावर त्यांच्याच गटातील नेत्यांनी दबाव आणला असल्याची माहिती मिळाली आहे.लोकसभेला महायुतीच्या हिताचा विचार करून आपण नमते घेतले आणि चार जागांवर समाधान मानले. दरवेळी आपणच त्याग का करायचा, अशी भावना आमच्या गटात असल्याचे संबंधित नेते म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस