शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
4
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
5
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
6
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
7
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
8
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
9
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
10
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
11
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
12
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
13
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
14
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
15
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
16
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
17
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
18
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
19
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
20
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला मिळाली मुदतवाढ, ग्रामविकास विभागाचे महत्त्वाकांक्षी अभियान

By समीर देशपांडे | Updated: January 2, 2026 17:47 IST

यशस्वी ग्रामपंचायतींना तब्बल २४५ कोटी २० लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

समीर देशपांडेकोल्हापूर : ग्रामविकास विभागाच्या वतीने तब्बल २९० कोटी रुपयांचे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ १७ सप्टेंबर २०२५ पासून सुरू झाले खरे. परंतु, तत्कालीन पूरस्थिती आणि सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग यामुळे ३१ मार्च २०२६ पर्यंत या अभियानाला मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘लोकमत’ने ११ ऑक्टोंबरला या अभियानातील अडचणी मांडून मुदतवाढ आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते.ग्रामविकास विभागाचे महत्त्वाकांक्षी अभियान म्हणून या अभियानाकडे पाहिले जाते. यातील यशस्वी ग्रामपंचायतींना तब्बल २४५ कोटी २० लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे अभियान सुरूही झाले. परंतु, २९ जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली. शासनाला त्यासाठी ३२ हजार कोटींचे पॅकेजही जाहीर करावे लागले.

दिवाळी संपल्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका लागल्या. सध्या महापालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे आणि जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अभियान केवळ प्रशासकीय राहण्याची भीती व्यक्त होत होती.या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने हा विषय मांडल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चाही केली. परंतु लगेचच मुदतवाढ दिली तर सुरू असलेले कामही थांबायला नको यासाठी ही मुदतवाढ उशिरा जाहीर करण्यात आली.

दरवर्षी नवीन गावांना बक्षिसे

या अभियानात दरवर्षी २० टक्के गावांचा सहभाग आणि नवीन गावांना बक्षिसे अशी दुरुस्ती करण्यात आली असून, सर्वच गावांवर एकाचवेळी लक्ष केंद्रित करण्यापेक्षा दरवर्षी २० टक्के गावांमध्ये अभियान परिणामकारक पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच त्याच गावांना बक्षिसे न मिळता ती नवनवीन गावांना मिळावीत, असेही नियोजन आहे.

हे अभियान संपूर्ण यशस्वी होण्यासाठी मुदतवाढ आवश्यक होती. मराठवाडा, विदर्भामध्ये ग्रामस्थ अडचणीत होते. निवडणुकांचे वातावरण आजही आहे. ग्रामविकास विभागाने या अभियानाचे नव्याने वेळापत्रक जाहीर करावे, अशी आम्ही सरपंच परिषदेमार्फत मागणी केली होती. ती या मुदतवाढीने पूर्ण झाली. - दत्ताभाऊ काकडे, अध्यक्ष, सरपंच परिषद

English
हिंदी सारांश
Web Title : Chief Minister's Prosperous Panchayat Raj Abhiyan gets extension for success.

Web Summary : The Chief Minister's Prosperous Panchayat Raj Abhiyan, worth ₹290 crore, gets an extension until March 31, 2026, due to floods and local elections. Successful gram panchayats stand to win ₹245.20 crore in prizes. The scheme aims to reward new villages annually.