शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

'देवाभाऊ, आरक्षण सोडतीतील अनागोंदी कारभाराकडे लक्ष द्या', कोणी केली मागणी.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 19:57 IST

चक्रानुक्रमाच्या मूळ उद्देशाला फासला हरताळ

विटा : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भातील आरक्षण सोडतीत ग्रामविकास विभागाकडून गंभीर चुका झाल्या आहेत. त्या दुरुस्ती मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी ॲड.बाबासाहेब मुळीक यांनी केली असून, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ग्रामविकास विभागाच्या कारभारातील अनियमिततेकडे लक्ष वेधले आहे.ॲड.बाबासाहेब मुळीक म्हणाले, ग्रामीण विकास विभागाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती (जागेचे आरक्षण पद्धत व चक्रानुक्रम) नियम, २०२५ राजपत्रात प्रसिद्ध केले असून, नियम क्र. १२ नुसार २०२५ ची निवडणूक ही चक्रानुक्रमातील एक निवडणूक ठरविण्यात आली आहे. यामुळे राज्यातील ग्रामीण जनतेत असंतोष निर्माण झाला असून, मुंबई, तसेच नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल झाल्या आहेत.

मुळीक यांनी महिला आरक्षणाबाबतही विसंगती निदर्शनास आणून दिला आहे. राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षांपैकी १८ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, परंतु नियमाप्रमाणे ५० टक्के म्हणजेच १७ जागा असणे आवश्यक होते. पंचायत समिती सभापती पदांमध्ये ३२१ पदांपैकी १६९ महिला आरक्षण असून, ते ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे.ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षणात अनुसूचित जमातींसाठी सांगली जिल्ह्यात ५ जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, कायद्यानुसार त्या ४ असणे अपेक्षित आहे. या सर्व बाबतीत ग्रामविकास विभागाला लेखी निवेदन देऊन या सर्व चुका निदर्शनास आणून दिल्या आहेत. मात्र, कोणतीही कारवाई न झाल्यामुळे थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करावा व चुका दुरुस्त कराव्यात, अशी ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी मागणी केली आहे.

चक्रानुक्रमाच्या मूळ उद्देशाला फासला हरताळसांगली जिल्ह्यात म्हैसाळ, मालगाव, कवलापूर, बेडग, उमदी, रांजणी आणि सावळज हे सात जि.प. गट पुन्हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. जे पूर्वीही अनेक वेळा आरक्षित होते. त्यामुळे आरक्षणाची पुनरावृत्ती झाली असून, चक्रानुक्रमाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला असल्याचा आरोप त्यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Fix reservation errors: Advocate Mulik urges Chief Minister intervention.

Web Summary : Advocate Babasaheb Mulik requests CM's intervention to correct reservation flaws in Zilla Parishad, Panchayat Samiti, and Gram Panchayat elections. He highlights discrepancies in women's reservations and cyclic rotation, demanding immediate rectification of errors.