शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भाजपा अजगर अन् मगरीसारखी, सोबत असतात त्यांना खाऊन टाकते; संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 11:22 IST

ज्यांनी शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसला, बेईमानी केली, जे पैशाला विकले गेले त्यांच्यासाठी परत दरवाजे उघडले जाणार नाही असा उद्धव ठाकरेंनी धोरणात्मक निर्णय घेतला आहे असं राऊतांनी सांगितले.

मुंबई - भाजपा अजगर, मगरीसारखी आहे. जे त्यांच्यासोबत गेले त्यांना भाजपाने खाऊन टाकले. भाजपाचा मूळ स्वभाव आणि भूमिका सोडली नाही. गजानन किर्तीकरांसारखा आमचे जुने सहकारी तिथे जाऊनसुद्धा सुखी आनंदी नाहीत याचा अर्थ भाजपाने हा कोंबड्यांचा खुराडा पाळला आहे. त्यातील एक एक कोंबडी कापायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंची भूमिका योग्य होती हे त्यांना कळेल अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि शिंदे गटावर केली आहे. 

संजय राऊत म्हणाले की,  गजानन किर्तीकर सोडून जाणे हे आमच्यासाठी वेदनादायी होते, पण आज ते भाजपा आम्हाला लाथा घालतायेत, नीट वागवत नाही असं सांगतात, मग आम्ही काय वेगळे सांगत होतो. भाजपा शिवसेनेला सावत्रपणाची वागणूक देतेय, म्हणून शिवसेना त्यांच्यापासून वेगळी झाली, फुटलेल्या गटात अस्वस्थता आणि नाराजी आहे. झालेल्या गटातच २ गट पडले आहेत. गजानन किर्तीकरांनी जे सांगितले ती आमची भूमिका आहे. दिलेला शब्द पाळला नाही, शिवसेनेच्या आमदार, खासदारांची कामे रखडवून ठेवली. सत्तेत असताना निधी दिला जात नव्हता. प्रमुख लोकांना अपमानित करण्याचा प्रयत्न केला. समान भागीदारी असून शिवसेनेला न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्वांशी चर्चा करून एक भूमिका घेतली तेच आज सांगितले जातंय असं त्यांनी म्हटलं. 

गद्दारांना पुन्हा प्रवेश नाही ज्यांनी शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसला, बेईमानी केली, जे पैशाला विकले गेले त्यांच्यासाठी परत दरवाजे उघडले जाणार नाही असा उद्धव ठाकरेंनी धोरणात्मक निर्णय घेतला आहे आणि ही महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेची आणि शिवसैनिकांची इच्छा आहे. आम्हाला शिवसैनिकांना तोंड द्यावे लागेल. गद्दारांबद्दल रोष व्यक्त होतोय. आमच्या संपर्कात आहेत, मेसेज देतात. चेहऱ्यावर काहीही असले तरी मनातील भावना गजानन किर्तीकरांनी बोलून दाखवली. जे पक्ष सोडून गेले त्यांना पुन्हा प्रवेश नाही. आमच्याच नाही सर्व पक्षातील लोकांनी हेच करावे असं सांगत राऊतांनी शिंदेसोबत गेलेल्यांसाठी परतीचे दरवाजे बंद केल्याची माहिती दिली. 

देवेंद्र फडणवीसांची दया येते....महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत आहे. मुख्यमंत्री सातत्याने दिल्लीत हेलपाटे मारतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काय जबाबदारी आहे माहिती नाही. आधी मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते आणि उपमुख्यमंत्री झाले. काल मुख्यमंत्र्यांची गाडी चालवत होते. मला देवेंद्र फडणवीसांची दया आणि किव येते. या संकटातून फडवीसांची सुटका व्हावी ही प्रार्थना आहे असा खोचक टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला. 

अर्बन नक्षलवाद हे भाजपा सरकारचे अपयश अर्बन नक्षलवाद अद्याप मोडता आला नाही त्याला जबाबदार कोण? गृहमंत्री कोण आहेत? हे तुमचे अपयश आहे. तुमच्या व्यवस्थेविरोधात हे बंड आहे. सरकार कष्टकरी, शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्न सोडवण्यात अपयशी पडतेय, त्यामुळे अशा वृत्ती, प्रवृत्ती राज्यात फोफावतायेत. हे तुमच्या सरकारचे अपयश आहे. नक्षलवादाच्या नावाखाली निरपराध, चुकीच्या लोकांना अटक करताय. खोट्या प्रकरणात गृहखात्याचा वापर करून तुम्ही लोकांना नक्षलवादी ठरवताय असा आरोप राऊतांनी भाजपा सरकावर केला.   

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाGajanan Kirtikarगजानन कीर्तीकर