शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

'देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची', नाना पटोलेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 19:27 IST

Nana Patole's Appeals: मोदी सरकारच्या हुकुमशाहीतून देश व लोकशाही वाचवण्याची लढाई असून ही लढाई केवळ काँग्रेस पक्षाची नाही तर आपल्या सर्वांची आहे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

मुंबई -  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा खोटे बोलून सत्तेत आले आहे. सत्तेत येताच मोदी सरकारने घटनामत्क व्यवस्थेची मोडतोड केली. लोकशाही व संविधान धाब्यावर बसवूर मनमानी कारभार सुरु आहे. काँग्रसने ६० वर्षात देशभरात विविध संस्थांचे जाळे उभे करुन विकास सगळीकडे पोहचवला आणि मोदी सरकार त्याच संस्था विकून देश चालवत आहेत. मोदी सरकारच्या हुकुमशाहीतून देश व लोकशाही वाचवण्याची लढाई असून ही लढाई केवळ काँग्रेस पक्षाची नाही तर आपल्या सर्वांची आहे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जनसंवाद यात्रेदरम्यान नाना पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मोदी सरकारविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी ही जनसंवाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, घर कसे चालवायचे ही चिंता लोकांना सतावत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव उतरलेले असतानाही मोदी सरकार मात्र पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करत नाही. राज्यातील येड्याच्या सरकारने वीज महाग केली आहे. शेतीला आठ तासही विज मिळत नाही, या परिस्थितीच्या विरोधात आपल्याला लढायचे आहे.

जनसंवाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी चंद्रपूर जिल्हा सेवादलाने आयोजित केलेल्या संस्कृतीक कार्यक्रमानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहणानंतर चंद्रपूर सेवादलाचे अध्यक्ष सुर्यकांत खणके यांनी जनसंवाद यात्रेसाठी ध्वज नाना पटोले यांच्याकडे हस्तांतरित केला. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सकाळच्या सत्रात नगर जिल्ह्यातील जनसंवाद यात्रेत सहभाग घेतला व नंतर उत्तर महाराष्ट्रातील जनसंवाद यात्रेच्या तयारीची आढावा बैठक घेतली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वडकी, राळेगाव, आर्णी, महागाव येथे जनसंवाद यात्रेत सहभागी होत  जनतेला संबोधित केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस