शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 22:05 IST

"माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखाद संकट येईपर्यंत, आपण एकत्र होण्याची वाट कशाला बघायची. आपण नुसते एकवटलो आहोत. तर या संकटाला माघारी जावे लागले. म्हणून आता आलेली जाग आपल्याला कायम ठेवावी लागेल." 

राज्यात, पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या मु्द्द्यावरून राज्यातील राजकारण तापले असतानाच, आज राज्य सरकारने हिंदी भाषेसंदर्भातील निर्णय मागे घेतला. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. यासंदर्भात, आता राज्य सरकारच्या वतीने डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्र लागू करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. यानंतर, शिवसेना (ठाकरे गट) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया आली आहे. "आज हे आंदोलन केल्यानंतर, आता मराठी माणूस एकत्र होऊ नये, ५ तारखेला आम्ही जो मोर्चा ठरवला, तो मोर्चा होऊ नये, म्हणजे मराठी माणून एकत्र येऊ नये, म्हणून हा जीआर रद्द करण्यात आला," असे ठाकरे यांनी म्हटले आहे. 

ठाकरे म्हणाले, "आज संपूर्ण राज्यभरात हिंदी सक्तीच्या विरोधक आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारने काढलेल्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरलेली आहे. आपल्या राज्यातील सरकारने मराठी माणसाची एकजूट तोडण्याचा प्रयत्न केला. मराठी मते भाजपकडे खेचायची असा छुपा अजेंडा यामध्ये होता. पण समाधानाची गोष्ट म्हणजे, मराठी माणसाने जी एक समज्यस भूमिका घेतली की, आमचा भाषेला विरोध नाही, तर सक्तीला विरोध आहे. यामुळे इतर भाषिकांनाही कळले की, आपल्या भाषेविरुद्ध नाही, तर या राज्यातील मातृभाषेविरुद्ध जी सक्ती केली जाते, त्या सक्तीच्या विरोधात हे आंदोलन आहे. यामुळे ही फूट पडली नाही."

"या सरकारचा हाच प्रयत्न होता की, मराठी माणसांतील फूट आपल्याला लाभदायक ठरेल, असे त्यांना वाटले होते. म्हणून मराठी माणसांत फूट पाडायची. मराठी माणूस इतक्या मोठ्या प्रमाणात एकवटेल याची सरकारला कल्पना नव्हती. आज हे आंदोलन केल्यानंतर, आता मराठी माणूस एकत्र होऊ नये, कारण ५ तारखेला आम्ही जो मोर्चा ठरवला, तो मोर्चा होऊ नये, म्हणजे मराठी माणून एकत्र येऊ नये, म्हणून जीआर रद्द केला," उसे उद्धव ठाकरे म्हणाले.  भाजप म्हणजे अफवांची फॅक्टरी -ठाकरे पुढे म्हणाले, "मध्यंतरी एक पिक्चर आला होता, हरिश्चंद्राची फॅक्ट्री, तसा भाजप म्हणजे अफवांची फॅक्टरी झालाय. अफवा पसरायच्या, विरोधकांची बदनामी करायची आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणे हा भाजपचा धंदा झाला आहे. त्या धंद्याला आज मराठी माणसाने चोख उत्तर दिलं आहे. माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखाद संकट येईपर्यंत, आपण एकत्र होण्याची वाट कशाला बघायची. आपण नुसते एकवटलो आहोत. तर या संकटाला माघारी जावे लागले. म्हणून आता आलेली जाग आपल्याला कायम ठेवावी लागेल." 

"सर्व मराठी माणसांना मी हात जोडून विनंती करतो की, आपण या सक्तीच्या विरोधात एकवटलो होतो. ती सक्ती मागे घेण्यात आली आहे. तरीही पाच तारखेला आपण मोर्चा काढायचा की सभा घ्यायची, कुठे घ्यायची, कधी घ्यायची, यासंदर्भातील कार्यक्रमासंदर्भात दोन दिवसांमध्ये सगळ्यांसोबत बोलून मी ठरवेल,"  असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारBJPभाजपाShiv Senaशिवसेना