शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"तेच ते… तेच ते…’’ भाजपाचा चारोळीतून उद्धव ठाकरेंना टोला, व्यंगचित्रामधून उडवली मुलाखतीची खिल्ली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 10:32 IST

BJP Criticize Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या आज प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीची भाजपाने व्यंगचित्राच्या माध्यमातून खिल्ली उडवली असून, या मुलाखतीत तेच तेच विषय मांडले असल्याचा टोला लगावण्यात आला आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग दैनिक सामनामध्ये आज प्रसिद्ध झाला आहे. या भागात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फोडणाऱ्या शिंदे गटासह भाजपावर घणाघाती टीका केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीची भाजपाने व्यंगचित्राच्या माध्यमातून खिल्ली उडवली असून, या मुलाखतीत तेच तेच विषय मांडले असल्याचा टोला लगावण्यात आला आहे. 

भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक व्यंगचित्र आणि चारोळी शेअर करत संजय राऊत यांनी घेतलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे. ‘’तेच ते… तेच ते… माकडछाप दंतमंजन, तोच ‘जोडा’ तेच रंजन तीच ‘रडगाणी’ तेच तराणे, ‘बाकी मूर्ख’ तेच शहाणे सकाळपासून रात्रीपर्यंत…तेच ते… तेच ते’’, या चारोळीमधून केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच व्यंगचित्राच्या माध्यमातून संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचीही उपाध्ये यांनी खिल्ली उडवली आहे. या व्यंगचित्रामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत समोरासमोर बसून क्रिकेट खेळत असल्याचे दाखवे आहे. तसेच संजय राऊत यांनी सरपटी चेंडू टाकल्यावर उद्धव ठाकरे तो चेंडू तटवतात. तर संजर राऊत सिक्स म्हणून आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. 

दरम्यान, सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीमधील पहिल्या भागात त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर घणाघाती टीका केली. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसैनिकांच्या मेहनतीने जे देऊ शकत होतो ते दिले. बरेच लोक बाहेरून आले तसे गेले असं नाही. ते तसे आले-गेले हा एक भाग झाला, पण ज्यांचा राजकारणातला जन्मच शिवसेनेत झाला. त्यांनीसुद्धा शिवसेना आईवर वार केलाच ना अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका केली. 

यावेळी भाजपाने नव्याने मांडलेल्या एनडीएवरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले की, बऱ्याच वर्षांनंतर या देशात 'एनडीए' नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं आणि आपण जे देशभक्त राजकारणी आहोत त्यांची 'इंडिया' नावाची एक आघाडी केलेली आहे त्याला उत्तर देण्यासाठी. त्याच दिवशी आपल्या पंतप्रधानांनी छत्तीस पक्षांची जेवणावळ यातली. खरं म्हणजे छत्तीस पक्षांची त्यांना गरज नाहीय. त्यांच्या 'एनडीए'मध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा