ठरलं...! या दिवसापासून सुरू होणार राज ठाकरेंचा झंझावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2017 19:39 IST2017-02-12T18:31:02+5:302017-02-12T19:39:34+5:30

इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत मनसे प्रचारत मागे राहिले आहेत. त्यामुळे प्रचारात उशिराने एन्ट्री करुन राज ठाकरे कशाप्रकारे बाजी घणाघात करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

That's it! Raj Thackeray's storm will start from this day | ठरलं...! या दिवसापासून सुरू होणार राज ठाकरेंचा झंझावात

ठरलं...! या दिवसापासून सुरू होणार राज ठाकरेंचा झंझावात

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - मुंबईसह दहा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. शिवसेना-भाजपा-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाची लढाई सुरु आहे. या सर्वात राज ठाकरेंचा मनसे पक्ष काहीसा मागे पडला होता. मात्र, आता राज ठाकरेंच्या झंझावती दौरा जाहीर झाला आहे.

येत्या 14 फेब्रुवारीपासून राज ठाकरे प्रचाराला सुरुवात करणार आहेत. मुंबईत 14 फेब्रुवारीला राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. राज ठाकरे मुंबईत एकूण 3 प्रचारसभा घेणार आहेत. विक्रोळीमध्ये पहिली सभा, त्याच दिवशी विलेपार्ले येथे दुसरी सभा होईल. तर तिसरी सभा 18 फेब्रुवारीला दादरमध्ये होईल.

ठाणे, नाशिक आणि पुण्यातही राज ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. मात्र, मुंबई वगळा इतर सभांच्या तारखा आणि ठिकाणं यांची माहिती मिळू शकलेली नाही. इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत मनसे प्रचारत मागे राहिले आहेत. त्यामुळे प्रचारात उशिराने एन्ट्री करुन राज ठाकरे कशाप्रकारे बाजी घणाघात करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: That's it! Raj Thackeray's storm will start from this day