किसमे कितना है दम हे लवकरच कळेल - उद्धव ठाकरे

By Admin | Updated: August 30, 2015 19:46 IST2015-08-30T19:46:46+5:302015-08-30T19:46:55+5:30

'किसमे कितना है दम' हे लवकरच कळेल असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंना लगावला आहे.

Thats how soon it will be - Uddhav Thackeray | किसमे कितना है दम हे लवकरच कळेल - उद्धव ठाकरे

किसमे कितना है दम हे लवकरच कळेल - उद्धव ठाकरे

ऑनलाइन लोकमत

मीरा भाईंदर, दि. ३० - 'किसमे कितना है दम' हे लवकरच कळेल असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंना लगावला आहे. विनोद तावडेंनी जहाँ कम वहाँ हम असे विधान केले होते व यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला. 

मीरा भाईंदर महापालिकेच्या नाट्यगृहाचे आज भूमीपुजन झाले. याप्रसंगी उद्धव ठाकरे व विनोदी तावडे उपस्थित होते. या दोन नेत्यांमध्ये रंगलेल्या टोलेबाजीने उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. नाट्यगृहांसाठी सांस्कृतिक विभाग निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देत विनोद तावडे म्हणाले जहाँ कम वहाँ कम. तावडेंच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित करत विनोद तावडेंना टोला लगावला. उद्धव ठाकरे म्हणाले, किसमे कितना है दम हे आगामी काळात दिसेल. उद्धव ठाकरेंनी विनोद तावडेंना उद्देशून हे विधान केल्याने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. 

 

Web Title: Thats how soon it will be - Uddhav Thackeray