ठाणे: एसटी कंडक्टरला चावा घेणा-या प्रवाशाला अटक, पैसे जास्त घेतल्याच्या संशयातून घेतला होता चावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 22:24 IST2017-10-16T22:24:08+5:302017-10-16T22:24:32+5:30
पैसे जास्त घेतल्याच्या संशयातून कल्पेश चोरगे या वाहकाला (कंडक्टर) चावा घेणा-या रमेश पेटकुलकर (४८) या एसटीच्या प्रवाशाला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली.

ठाणे: एसटी कंडक्टरला चावा घेणा-या प्रवाशाला अटक, पैसे जास्त घेतल्याच्या संशयातून घेतला होता चावा
ठाणे - पैसे जास्त घेतल्याच्या संशयातून कल्पेश चोरगे या वाहकाला (कंडक्टर) चावा घेणा-या रमेश पेटकुलकर (४८) या एसटीच्या प्रवाशाला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
आझादनगर येथे राहणारा रमेश हा दारूच्या नशेत होता. तो रविवारी (१५ आॅक्टोबर रोजी) नशेतच ठाणे स्टेशन ते वाघबीळनाका असा ओवळा एसटीने रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास प्रवास करीत होता. वाहक चोरगे यांनी तिकिटाचे जादा पैसे घेतल्याच्या संशयातून त्याने त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यांचा हा वाद वाघबीळपर्यंत सुरूच होता. तिकिटामध्ये अधिभाराचेही पैसे समाविष्ट केल्याचे त्याला पटवून दिले, तरी त्याला वाहकाचा दावा काही पटेना. अखेर, वाघबीळनाका येथे उतरताना त्याने रमेश यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला चावा घेतला. याप्रकरणी सोमवारी पहाटे कासारवडवली पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे आणि दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक केल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.
रविवारी सकाळी रेल्वे प्रवासादरम्यान एक प्रवासी तीन प्रवाशांना चावला होता. तसेच ठाणे स्टेशन परिसरात रिक्षाची वाट पाहणाºया परिसरातही एक मनोरु ग्ण चावल्याची घटना घडली आहे.