शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

ठाणे : हेरॉइनची तस्करी, ३९ लाखांचा माल हस्तगत, एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 4:56 AM

हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणा-या सोनू शाग्गीर अहमद अन्सारी (रा. मुंब्रा) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली.

ठाणे : हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणा-या सोनू शाग्गीर अहमद अन्सारी (रा. मुंब्रा) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. त्याच्याकडून ३९२.५ ग्रॅम वजनाचे ३९ लाख २५ हजारांचे हेरॉइन हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.अन्सारी हा हेरॉइन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांच्या पथकाने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एसटी स्थानक परिसरात बुधवारी उपनिरीक्षक धर्मराज बांगर, हवालदार जगन्नाथ सोनवणे, महादेव चाबुकस्वार, नाईक बिपेश किणी, अमोल पवार आदींनी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्या अंगझडतीमध्ये हेरॉइन हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याने मध्य प्रदेशातून हे अमली पदार्थ आणल्याची कबुली दिली. मात्र, ते कोणाकडून आणले, कोणाला विकणार होता, त्याने यापूर्वीही अशी विक्री केली आहे का, या सर्व बाबींची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.नशेची औषधे हस्तगत-अन्य एका घटनेत साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांच्या पथकाने मुंब्रा भागातून १० आॅक्टोबर रोजी इरशाद मोहमद अझर खान याला मुंब्य्रातून अटक केली.त्याच्याकडे विनापरवाना खोकल्यावरील फेन्सिरेक्स या औषधाच्या ८ हजार ५५० बॉटल्स औषध हस्तगत केल्या. या प्रकरणी खानविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला १४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हाthaneठाणे