ठाण्यात २ अपघात, १ ठार, १ जखमी

By Admin | Updated: May 10, 2017 03:16 IST2017-05-10T03:16:18+5:302017-05-10T03:16:18+5:30

ठाण्यात सोमवारी झालेल्या दोन अपघातात एका वृद्धाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. दिनेशचंद्र ठक्कर (७०) पायी जाताना

Thane has two accidents, one killed and one injured | ठाण्यात २ अपघात, १ ठार, १ जखमी

ठाण्यात २ अपघात, १ ठार, १ जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यात सोमवारी झालेल्या दोन अपघातात एका वृद्धाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. दिनेशचंद्र ठक्कर (७०) पायी जाताना डिमार्टसमोर भरधाव मोटारसायकलने धडक दिली. यात त्यांना जबर दुखापत झाली. कानातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी संजय भुसारेविरूद्ध गुन्हा दाखल केला. दुसऱ्या अपघातात सिद्धेश राऊत मोटारसायकलने कापूरबावडी नाक्यावरून जाताना भरधाव टेम्पोने धडक दिली. त्यामुळे मोटारसायकल टेम्पोच्या समोरच्या भागात अडकून सिद्धेशला जबर दुखापत झाली. टेम्पो चालक संतोष शेंडगेला पोलिसांनी अटक केली.

Web Title: Thane has two accidents, one killed and one injured