शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ५१४ रुग्ण वाढीसह ४० जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 21:50 IST

Coronavirus: ठाणे जिल्ह्यातील महापालिकांसह गांवपाड्यात गेल्या २४ तासात मंगळवारी ५१४ कोरोना रुग्णांची वाढ झाली ४० जणांचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटकर्क 

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांसह गांवपाड्यात गेल्या २४ तासात मंगळवारी ५१४ कोरोना रुग्णांची वाढ झाली ४० जणांचा मृत्यू झाला. आता मृतांची संख्या ९ हजार २८८ झाली . तर आतापर्यंत रुग्ण संख्या पाच लाख १६ हजार ९०३ नोंदली आहे.

ठाणे शहर परिसरात आज १२४ रुग्णांची वाढ होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात एकूण एक लाख २९ हजार १०४ रुग्णांसह एक हजार ९०४ मृतांची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीला ११५ रुग्णांची वाढ तर २० मृत्यू झाले आहेत. या शहरातील रुग्ण संख्या एक लाख ३३ हजार १६० झाली असून मृतांची संख्या आता दोन हजार २५ नोंदली आहे. 

उल्हासनगरात ३३ रुग्ण आढळले असून एक मृत्यू झाला आहे. येथील मृतांची संख्या आता ४७४ झाली असून रुग्ण संख्या २० हजार ४८८ नोंद झाली आहे. भिवंड शहरात सहा रुग्ण आढळले असता एक मृत्यू झाला आहे.  या शहरात १० हजार ४६४ रुग्णांसह ४४० मृतांची नोंद करण्यात आली. मीरा-भाईंदरलाही ५६ रुग्णांच्या वाढीसह आज तीन मृत्यू झाले. येथील रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ३७ झाली असून मृतांची संख्या एक हजार २७८ नोंद झाली.

अंबरनाथ शहरात १९ रुग्ण वाढल्याने येथील रूग्ण संख्या आता १९ हजार ३१५ झाली. तर ४०७ मृतांची नोंद करण्यात आली. बदलापूरला २५ रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. एकूण २० हजार ६०९ रुग्ण संख्या झाली असून २१५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण भागात ६० रुग्ण आढळले असून सहा मृत्यू झाले आहेत. आता जिल्ह्यातील या गांवपाड्यात ३६ हजार ६३३ रुग्णांसह ८९४ मृतांची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे