Coronavirus: ठाणे जिल्ह्यात ५०३ नवे रुग्ण; तर ३७ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 21:24 IST2021-06-16T21:24:12+5:302021-06-16T21:24:44+5:30
Coronavirus: ठाणे जिल्ह्यात बुधवारी ५०३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात ५०३ नवे रुग्ण; तर ३७ रुग्णांचा मृत्यू
ठाणे :ठाणे जिल्ह्यात बुधवारी ५०३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख २६ हजार ४७६ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार ३९० झाली आहे.
ठाणे शहर परिसरात ११७ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३१ हजार ९६४ झाली आहे. शहरात ५ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ९५५ झाली आहे. तर कल्याण - डोंबिवलीत १३३ रुग्णांची वाढ झाली असून ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत ७४ रुग्णांची वाढ झाली असून ६ मृत्यूची नोंद झाली आहे.
उल्हासनगरमध्ये ८ रुग्ण सापडले असून एका मृत्यूची नोंद आहे. भिवंडीत ७ बाधीत असून मृत्यूची नोंद नाही. मीरा भाईंदरमध्ये ६५ रुग्ण आढळले असून २ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये ११ रुग्ण आढळले असून ३ मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये २४ रुग्णांची नोंद असून १७ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ६४ नवे रुग्ण वाढले आहेत. आता बाधीत रुग्णसंख्या ३८ हजार ५२६ झाली असून आतापर्यंत ११४० मृत्यूंची नोंद आहे.