ठाणे जिल्ह्यात ४१७ नवे रुग्ण; तर १३ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 09:30 PM2021-06-18T21:30:52+5:302021-06-18T21:31:29+5:30

ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी ४१७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.

thane district reports 417 new corona cases and 13 deaths in last 24 hours | ठाणे जिल्ह्यात ४१७ नवे रुग्ण; तर १३ रुग्णांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात ४१७ नवे रुग्ण; तर १३ रुग्णांचा मृत्यू

Next

ठाणे :ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी ४१७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख २७ हजार ४०० रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात १३ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार ४६२  झाली आहे. 

ठाणे शहर परिसरात ८२ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख ३२ हजार १५६  झाली आहे. शहरात ४ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ९६३ झाली आहे. तर कल्याण - डोंबिवलीत ७९ रुग्णांची वाढ झाली असून एकही  मृत्यूची नोंद नाही. नवी मुंबईत ९३ रुग्णांची वाढ झाली असून ७ मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये ४ रुग्ण सापडले असून  मृत्यूची नोंद नाही. भिवंडीत ७ बाधीत असून मृत्यूची नोंद नाही. मीरा भाईंदरमध्ये ६५ रुग्ण आढळले असून एक मृत्यूची नोंद आहे. 

अंबरनाथमध्ये १२ रुग्ण आढळले असून मृत्यूची नोंद नाही. बदलापूरमध्ये १८ रुग्णांची नोंद असून १  मृत्यूची नोंद आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ५७ नवे रुग्ण वाढले असून  मृत्यूची नोंद नाही. आता बाधीत रुग्णसंख्या ३८ हजार ६७० झाली असून आतापर्यंत ११६४ मृत्यूंची नोंद आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: thane district reports 417 new corona cases and 13 deaths in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app