शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंची सेना धाकटी!; आता काँग्रेसने डिवचले, मविआत कलगी-तुरा सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 08:38 IST

शिवसेना गेल्यावेळी जिंकलेल्या १८ जागा लढवेलच शिवाय आणखी काही जागा मविआत मिळतील, असे विधान ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून सध्या मविआत नाराजीनाट्य सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क    मुंबई : मविआत राष्ट्रवादी हा मोठा भाऊ असल्याचे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्यानंतर आता काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना (ठाकरे गट) हा मविआत  तिसऱ्या क्रमांकाचा  पक्ष आहे, या शब्दांत सोमवारी डिवचले. मोठा कोण यावरून मविआत कलगी-तुरा सुरूच असल्याचे चित्र आहे.  

आघाडीमध्ये राष्ट्रवादी हाच क्रमांक एकचा पक्ष आहे. काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी हा मविआत मोठा भाऊ असल्याचे म्हणणे यात गैर काहीही नाही, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.   ते म्हणाले की, गेल्या काळात  जे जे निकाल आले ते बघून जागावाटपाचा निर्णय होईल. भाजपला कोणता पक्ष पराभूत करू शकेल, यावर चर्चा होणे गरजेचे आहे. जागावाटपाकरिता गांभीर्याने बसून सूत्र ठरविले जाईल. 

शिवसेना गेल्यावेळी जिंकलेल्या १८ जागा लढवेलच शिवाय आणखी काही जागा मविआत मिळतील, असे विधान ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी केले होते. त्यावरून सध्या मविआत नाराजीनाट्य सुरू आहे. राऊत यांनी सोमवारी जरा नरमाईचा सूर लावला. ते म्हणाले की, काही जागांची अदलाबदल करावी लागेल हे सत्य आहे. काही ठिकाणी तडजोडी कराव्या लागतील. तिन्ही पक्षांनी प्रत्येकी १६ जागा लढवाव्यात, असे अद्याप काहीही ठरलेले नाही.  

वाटप मेरिटनुसार : पटोले nमहाविकास आघाडीतील जागावाटप मेरिटनुसार होईल. सर्व बाजूंचा विचार करून जागा वाटप होईल आणि मेरिटवर निर्णय झाला तर अनावश्यक चर्चा थांबेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी स्पष्ट केले. nप्रत्येक पक्षाने जागांची चाचपणी केली पाहिजे यात काही गैर नाही, असे सांगताना पटोले यांनी प्रदेश काँग्रेसने संभाव्य जागांसाठी समित्या नेमल्याची माहिती दिली. nराष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कोणत्या पक्षातील कोणती व्यक्ती निवडून येऊ शकते, हा महत्त्वाचा निकष वापरला जाईल. तिन्ही पक्ष चर्चा करून ते ठरवतील, अशी प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसची आज बैठकमहाविकास आघाडीच्या जागावाटपात काय भूमिका घ्यायची, यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक मंगळवारी मुंबईत होणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आदी नेते बैठकीला उपस्थित राहतील.

टॅग्स :congressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस