शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे-राणे समर्थक भिडले, राजकोट किल्ल्याचे नुकसान, दगडी चिरे निखळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 15:47 IST

Rajkot Fort : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यात प्रवेश करताच नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक अचानक आक्रमक झाले.

राजकोट : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील (Rajkot Fort) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यात सर्वसामान्य जनतेने प्रचंड संताप व्यक्त केला. तसंच, याच घटनेवरून आज राजकोट किल्ल्यावर जोरदार राजकीय राडा पाहायला मिळाला.

घटनेची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर पोहोचले होते. मात्र, यादरम्यान भाजपाचे खासदार नारायण राणे आणि निलेश राणे हे देखील आपल्या समर्थकांसह किल्ल्यावर पोहोचले. यावेळी राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यात प्रवेश करताच नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक अचानक आक्रमक झाले. तसेच, बघता बघता ठाकरे आणि राणे समर्थकांमधील शाब्दिक चकमक थेट धक्काबुक्की आणि हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचली. जवळपास तासभर चाललेल्या या राड्यात दोन्ही गटाचे अनेक कार्यकर्ते आणि काही पोलीस जखमी झाल्याचेही सांगण्यात आले. मात्र, या राजकीय राड्यामुळे राजकोट किल्ल्याचे दुर्दैवाने मोठे नुकसान झाले आहे. या राड्यात किल्ल्याच्या तटबंदीचे काही दगडी चिरे निखळले आहेत. त्यामुळे शिवभक्तांकडून या घटनेचा तीव्र संताप उमटतांना आता दिसत आहे.

नेमकं घडलं काय? छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहेत. या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून आज  राजकोट किल्ल्यावर मोर्चा आयोजित करण्यात आल्याने आदित्य ठाकरे हे घटनास्थळी पाहणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक होते. पाहणी करत असतानाच भाजप खासदार नारायण राणे आणि निलेश राणे आपल्या समर्थकांसह किल्ल्यावर आले. त्यानंतर याठिकाणी मोठा राडा झाला. दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांच्या आंगावर धावून गेले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFortगडAaditya Thackerayआदित्य ठाकरेNarayan Raneनारायण राणे BJPभाजपा