शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 11:21 IST

सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली

Sanjay Raut: मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचा आरोप झालेल्या सुधाकर बडगुजर यांना भाजपने पक्षात घेतलं आहे. ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर मंगळवारी सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध डावलून हा पक्ष प्रवेश पार पडला. दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बडगुजर यांच्यावरुन भाजपवर टीका केली आहे. भाजपने सगळ्या देशद्रोही लोकांना पक्षात घेतल्याचे संजय राऊत म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरु असून  महाविकास आघाडीतील नाराज नेत्यांचा भाजप पक्षप्रवेश करुन घेत असल्याचे माध्यमांनी विचारले. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. "भाजप आता सलीम कुत्ताल प्रचाराला आणणार आहे. हा पक्ष असे भंगार गोळा करुनच मोठा झालेला आहे. दहशत, पोलीस यंत्रणांचा वापर करुन आमच्यातले लोक फोडाचे. यांच्याकडे स्वतःचे काय आहे. यांच्या पक्षातील ९० टक्के आमदार हे दुसऱ्या पक्षातील आहेत. यांच्याकडे स्वतःचे काही नाही," असं संजय राऊत म्हणाले.

"भाजप आणि शिंदे गटाला त्यांना भ्रष्ट, गुंड, दाऊदचे हस्तक लागतात. भाजपने आता सलीम कुत्ता याला संत म्हणून पदवी दिली पाहिजे. कारण ज्या व्यक्तीला त्यांनी पक्षात घेतले ती व्यक्ती आमच्याकडे असताना त्याचे सलीम कुत्तासोबत जोडून आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही देशद्रोही लोकांच्या खिशामध्ये जाऊन बसलेले आहात. भाजप अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्या विचारांचा राहिलेला नाही. प्रफुल्ल पटेल यांचे दाऊदच्या हस्तकाबरोबर संबंध आहेत हे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. त्यानंतर सलीम कुत्ता हे प्रकरण भाजपने काढलं आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी लावली होती. चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्यासोबत सलीम कुत्ता काल बिर्याणी खायला बसला होता का? देशद्रोही हा शब्द त्यांना लागू पडतो. कारण सगळे देशद्रोही त्यांनी त्यांच्या पक्षात घेतले आहेत. उद्या मुस्लिमांची मते हवी असतील म्हणून ते दाऊद इब्राहिमला पक्षात आणतील," असेही संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, बडगुजर यांची सलीम कुत्ता याच्याबरोबर एका पार्टीत नाचल्याचा व्हायरल झाल्यावर नितेश राणे, दादा भुसे व अन्य नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर  बडगुजर यांच्या पार्टीची विशेष चौकशी पथकाकडून तपासणी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. मात्र वर्षभरानंतर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे