शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

“विकसनशील भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार! मग १० वर्ष काय केले?”; उद्धव ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 14:04 IST

Uddhav Thackeray News: माझ्या शिवसैनिकांना विनाकारण त्रास द्याल, तर आमचे सरकार आल्यावर कायद्याचे फटके काय असतात हे तुम्हाला दाखवेन, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

Uddhav Thackeray News: कोकणाचा आशीर्वाद घेऊनच मी महाराष्ट्र फिरतोय. शिवसेना आणि कोकण हे नाते घट्ट आहे. मी माझ्या महाराष्ट्रासाठी काम करत होतो, म्हणून ‘भाडोत्री जनता पक्षा’ने आपले सरकार गद्दारी करून पाडले. भाजपच्या हिंदुत्वामध्ये शिव्या आहेत, आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या आहेत. आता म्हणतात की, विकसनशील भारतासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार! मग १० वर्ष काय करत होतात, असा थेट सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राज्यातील ठिकठिकाणी दौऱ्यावर आहेत. कोकण भेटीत गुहागर येथे जनसंवाद सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. भाजपचा ४०० पारचा डाव फक्त देशाची घटना बदलण्यासाठी आहे. घटना बदलून ते आपल्यावर हुकूमशाही लादणार आहेत. अधिकाऱ्यांना सांगतो, माझ्या शिवसैनिकांना विनाकारण त्रास द्याल, तर आमचे सरकार आल्यावर कायद्याचे फटके काय असतात हे तुम्हाला दाखवेन, असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना दिला. 

मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, पण मला ते पद स्वीकारावे लागले

मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. पण मला ते पद स्वीकारावे लागले. ज्यांनी तुम्हाला मोठे केले, तुमच्या मुलाबाळांची काळजी वाहिली, एखादे पद स्वीकारले तर काय झाले. शिवसेना ही चार अक्षरे त्यांच्या पाठी लागली नसती, तर तुम्ही त्यांना विचारले असते का, त्यांच्या शिवीगाळीला तुम्ही शिवीगाळ करून उत्तर देऊ नका. आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या, त्यांच्या हिंदुत्वामध्ये शिव्या आहेत. भाजपचे नासलेले, कुजलेल हिंदुत्व आहे. माझा एकही शिवसैनिक पंतप्रधान मोदींना अपशब्द वापरून त्यांच्यावर टीका करत नाही, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान, मासेमारी करायला गुजरातच्या बोटी येत आहे. सगळे गुजरातला नेत आहेत. मला गुजरातबद्दल राग नाही. गुजराती बांधवांच्या मदतीसाठीदेखील शिवसैनिक धावून जातो. वादळात मोदी इकडे फिरकले नाहीत. केंद्राने मदत केली नाही.  आम्ही खरे हिंदू आहोत. विदर्भात आपली लाट असून मोदी सरकारची वाट लागणार आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा भारतीय जनता पक्ष, तर आताचा भाडोत्री जनता पक्ष झाला असून, भाजपने भ्रष्टाचारी अभय योजना काढली, ही मोदी गॅरंटी आहे, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेguhagar-acगुहागरShiv Senaशिवसेनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४