शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

मोटार वाहन कर कमी होणार? ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 10:03 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत वाहतूकदार संघटनांच्या सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत तसे संकेत मिळाले.

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्य शासनाने गेल्या वर्षी मोटार वाहन कर ५० टक्के कमी करून मोठा दिलासा दिला होता. या वर्षीही तशी सवलत देण्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत वाहतूकदार संघटनांच्या सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत तसे संकेत मिळाले. कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या राज्यातील वाहतूकदारांच्या बाबतीत योग्य तो तोडगा लगेच काढला जाईल, वित्त व परिवहन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निर्देश देण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, उपाध्यक्ष महेंद्र लुले, सरचिटणीस दयानंद नाटेकर यांनी मागण्या मांडल्या. जड वाहन्यांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात, चेक पोस्टवर वाहनामागे केली जाणारी १९५ रुपयांची वसुली तत्काळ बंद करावी, चेक पोस्टच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारावेत, मोटार वाहन कर आणि व्यवसाय कर एक वर्षासाठी माफ करावा, अशा मागण्या करण्यात आल्या. कामगार वाहतूक करणाऱ्या वातानुकूलित बसचा कर कमी करावा, जड व अवजड वाहनांना राज्यातील प्रमुख शहरांत १० ते १६ तास करण्यात आलेली प्रवेशबंदी उठविणे, कालबाह्य प्रलंबित वाहतूक खटले रद्द करावेत, सार्वजनिक सेवा वाहनाच्या तपासणीचे पोलिसांचे अधिकार कमी करावेत, अशा मागण्याही पदाधिकाऱ्यांनी केल्या. राज्यातील शहरांमध्ये बस व ट्रक यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात वाहनतळ असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने नगरविकास विभागाला सूचना देण्यात येतील व मोकळ्या जागांचे नियोजन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. चेक पोस्ट्सच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यासंदर्भात देखील नियोजन करण्यास त्यांनी सांगितले. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार