शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे बंधूंचे परस्परपूरक राजकारण

By admin | Updated: January 12, 2015 03:48 IST

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचे ‘मिशन १००’ आणि नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेबरोबर सरसकट युती अशक्य

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाचे ‘मिशन १००’ आणि नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसेनेबरोबर सरसकट युती अशक्य असल्याचे दिलेले संकेत या पार्श्वभूमीवर उद्धव व राज ठाकरे यांनी परस्परपूरक राजकारण करण्याचे संकेत दिले आहेत.विधानसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेबरोबरची युती तोडली. त्या वेळी केंद्र सरकारमधील मंत्रिपद शिवसेनेने सोडले नाही. त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला खडेबोल सुनावत भूमिका स्पष्ट करण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसेना अगोदर विधानसभेत विरोधी पक्षात बसली व त्यानंतर सत्तेत सहभागी झाली. सेनेच्या या कोलांटउड्यांनंतर शिवसेना-मनसे संबंध कसे राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात कुतूहल होते. मात्र भाजपाच्या ‘धोका’तंत्राविरोधात प्रसंगी एकत्र येण्याच्या हालचाली ठाकरे बंधूंनी सुरू केल्या आहेत. भाजपाने युती नाकारल्यास कल्याण-डोंबिवली, मुंबई पालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ठाकरे बंधू परस्परपूरक राजकारण करू शकतात, असे निकटवर्तीयांचे मत आहे. (विशेष प्रतिनिधी)