रेल्वेच्या परीक्षेकडे उमेदवारांची पाठ
By Admin | Updated: December 1, 2014 00:49 IST2014-12-01T00:49:42+5:302014-12-01T00:49:42+5:30
रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या वतीने नागपुरात घेण्यात आलेल्या ग्रुप डीच्या पदाच्या परीक्षेकडे उमेदवारांनी पाठ फिरविली असून तब्बल २१ हजार ४७२ उमेदवार गैरहजर राहिले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

रेल्वेच्या परीक्षेकडे उमेदवारांची पाठ
२१ हजार गैरहजर : रेल्वेस्थानकाचा परिसर गर्दीने गजबजला
नागपूर : रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या वतीने नागपुरात घेण्यात आलेल्या ग्रुप डीच्या पदाच्या परीक्षेकडे उमेदवारांनी पाठ फिरविली असून तब्बल २१ हजार ४७२ उमेदवार गैरहजर राहिले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्यावतीने ग्रुप डीच्या पदासाठी नागपूर शहरातील ५३ केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले. परीक्षेसाठी एकूण २९ हजार ९९१ उमेदवारांनी अर्ज केले होते. यातील फक्त ८ हजार ५१९ उमेदवारच परीक्षेसाठी हजर झाले. उर्वरीत २१ हजार ४७२ उमेदवारांनी परीक्षेकडे पाठ फिरविली. परीक्षेला उपस्थित उमेदवारांची टक्केवारी फक्त २८.४० एवढीच नोंदविण्यात आली आहे. परीक्षेसाठी शाळेचे एकूण १ हजार ५५१ शिक्षक, रेल्वेचे १ हजार ५८ कर्मचारी आणि ७० अधिकारी उपस्थित होते. रेल्वे सुरक्षा दलाच्या ९५ जवानांनी चोख बंदोबस्त ठेऊन ही परीक्षा सुरळीत पार पाडली. दरम्यान चौथ्या टप्प्यातही उमेदवारांनी अल्पशी हजेरी लावल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.सून रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या वतीने परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आल्यानंतर तातडीने परीक्षा घेण्यात येत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान दुपारी १२.३० वाजता परीक्षा आटोपल्यानंतर उमेदवारांमुळे रेल्वेस्थानक गजबजून गेला होता. (प्रतिनिधी)