शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

10th, 12th Exam: दहावी परीक्षा रद्द, बारावीची होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 05:58 IST

HSC, SCC Exam Descision: बारावीची परीक्षा होणार हे निश्चित आहे. मे महिन्याच्या अखेरीस बारावीची परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोविड १९ ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत तसेच इतर केंद्रीय, आंतरराष्ट्रीय मंडळांनी त्यांच्या दहावीच्यापरीक्षा रद्द केल्यामुळे गुणांच्या समानीकरणासाठी अखेर राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्यापरीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामुळे राज्यातील दहावीचे सात विभागीय मंडळांतील तब्बल १६ लाख विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापनाद्वारे उत्तीर्ण होतील.

देशातील इतर सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बोर्डांनी त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. सर्व बोर्डांच्या निर्णयांमध्ये समानता राहावी म्हणून राज्य मंडळाचीही दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. अंतर्गत मूल्यमापन कसे आणि कोणत्या पद्धतीने करायचे यासाठी मार्गदर्शक सूचना लवकरच दिल्या जातील. तसेच  दहावीचे जे विद्यार्थी त्यांच्या गुणांबाबत समाधानी नसतील, त्यांना गुण सुधारण्याची संधी दिली जाईल. यासंबंधी कशा पद्धतीने कार्यवाही होईल, त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय जाहीर केला जाईल, असे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, बारावीची परीक्षा होणार हे निश्चित आहे. मे महिन्याच्या अखेरीस बारावीची परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.  

राज्यातील १६ लाख विद्यार्थ्यांना दिलासाविभागीय मंडळ - विद्यार्थीसंख्यापुणे - २७१५०३नागपूर - १५६२७१औरंगाबाद - १७७३११मुंबई - ३५९९३५कोल्हापूर - १३६२४२अमरावती - १५९७७१नाशिक - २०१६७५लातूर - १०५९१७कोकण - ३१५८१एकूण - १६००२०६ 

टॅग्स :examपरीक्षाssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा