शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

'सैराट' प्रेमावरून लातूरमधील 'तंटामुक्त' गावात वादाची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 11:57 IST

तंटामुक्त गावात आता तणावपूर्ण शांतता

लातूर: दोन वर्षांपूर्वी आलेल्या सैराट चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं. आर्ची आणि परशाच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण तिच्या कुटुंबीयांना लागताच गावात तणाव निर्माण होतो, असा प्रसंग सैराटमध्ये होता. लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडीतही सध्या असाच तणाव निर्माण झाला आहे. सातशेहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावाला तंटामुक्त गाव म्हणून गौरवण्यात आलं होतं. मात्र एका सैराट प्रेम कहाणीमुळे गावातील शांतता भंग पावली आहे. दलित समाजातील एका मुलाचे मराठा समाजातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन रुद्रवाडीतील वातावरण बिघडलं. या प्रकरणात पोलिसांकडे एफआयआर दाखल झाला आहे. 9 मार्च रोजी मराठा समाजाच्या 20 हून अधिक जणांनी दलित तरुणावर हल्ला केल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. या तरुणाला वाचवण्यास गेलेल्यांनाही मारहाण करण्यात आली, अशीही नोंद एफआयआरमध्ये आहे. प्रेम संबंधाच्या संशयावरुन दलित तरुणावर हल्ला झाल्यानंतर आमच्यावरही अनेकदा हल्ले झाल्याचं सरपंच शालूभाई शिंदे यांचा मुलगा नितीन यांनी सांगितलं. 'आम्ही पोलिसांकडे तक्रार नोंदवली. मात्र त्यावेळी कोणालाही अटक झाली नाही. तरुणावरील हल्ल्याच्या दोन दिवसानंतर काही लोक आमच्या घरात घुसले आणि काठ्यांनी आम्हाला मारहाण केली. त्याचवेळी आमच्या समाजाच्या एका मुलीचं लग्न सुरू होतं. आमच्या समाजातील काही लोक वधू-वरांसोबत मंदिरात गेले होते. आम्हाला त्या मंदिरात जाण्याची परवानगी नाही. आम्ही मंदिराच्या पायऱ्यांजवळूनच देवाला नमस्कार करतो. मात्र त्यादिवशी आम्हाला मंदिराच्या जवळही जाऊ देण्यात आलं नाही,' अशी माहिती नितीन यांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणात 22 जणांना अटक केली. यातील अनेकजण आता जामिनावर बाहेर आहेत. तक्रारकर्त्यांनी सामाजिक बहिष्काराची तक्रार दाखल केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबद्दल मराठा समाजानं वेगळीच कहाणी सांगितली आहे. 'प्रेमसंबंधांमुळे काहीतरी वाद झाला होता. मात्र हा वाद काही लोकांपुरता मर्यादित आहे. दुसऱ्या समाजाचे लोक विनाकारण आमच्या पूर्ण समाजाला बदनाम करत आहेत,' असा आरोप हल्ला प्रकरणात आरोपी असलेल्या दत्तात्रय अतोलकर यांनी केला.   

टॅग्स :laturलातूरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarathaमराठाDalit assaultदलितांना मारहाण