दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार, संशयित फरार

By Admin | Updated: July 17, 2016 20:31 IST2016-07-17T20:31:02+5:302016-07-17T20:31:02+5:30

औद्योगिक वसाहत परिसरात राहणाऱ्या एका दहा वर्षांच्या मुलीवर संशयित आरोपी राजू निकम (वय ४०) याने शनिवारी मध्यरात्री अत्याचार केल्याची संतापजनक घडना घडली.

Ten years old girls are tortured, suspected absconding | दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार, संशयित फरार

दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार, संशयित फरार

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. १७ : औद्योगिक वसाहत परिसरात राहणाऱ्या एका दहा वर्षांच्या मुलीवर संशयित आरोपी राजू निकम (वय ४०) याने शनिवारी मध्यरात्री अत्याचार केल्याची संतापजनक घडना घडली. घटनेनंतर निकम फरार झाला. त्याच्याविरुध्द औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनला बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीचे वडील हे कुटुंबाला सोडून निघून गेले आहेत तर आईचे निधन झाले आहे. ती आजी व मामाकडे वास्तव्याला आहे. आजीदेखील आजारीच राहत असल्याने ही मुलगी घरातील सर्व कामे करते. संशयित राजू निकम हा भाड्याने रिक्षा चालवतो. तो मुळचा धरणगाव तालुक्यातील आहे. पीडित मुलीच्या घरासमोरच पत्नी व मुलींसह राहतो. त्याच्या मोठ्या मुलीचे लग्न झालेले आहे. पत्नी बाहेर राज्यातील आहे. दोन दिवसापासून रिक्षा खराब असल्याने तो घरीच असायचा. दारुचे व्यसन असल्याने तो रात्री पीडित मुलीच्या घरात घुसला व तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार मुलीने सकाळी आजी व मामाला सांगितला. त्यांनी पोलीस स्टेशन गाठून झालेली घटना सांगितली. महिला उपनिरीक्षक सुजाता राजपूत यांनी पीडित मुलीचा इनकॅमेरा जबाब नोंदविला.

Web Title: Ten years old girls are tortured, suspected absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.