शहर पर्यटनासाठी दहा लाख

By Admin | Updated: May 30, 2014 09:07 IST2014-05-30T01:09:16+5:302014-05-30T09:07:17+5:30

अहमदनगर : शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थायी समितीने पुढाकार घेतला आहे. शहर पर्यटनासाठी अर्थसंकल्पात दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली

Ten million for city tourism | शहर पर्यटनासाठी दहा लाख

शहर पर्यटनासाठी दहा लाख

 अहमदनगर : शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी स्थायी समितीने पुढाकार घेतला आहे. शहर पर्यटनासाठी अर्थसंकल्पात दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून प्रत्येक शनिवारी, रविवारी नगर शहर दर्शन बससेवा सुरू होणार आहे. स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले यांच्या पुढाकारातून पर्यटन संकल्पना पुढे आली आहे. पर्यटनाच्यादृष्टीने ऐतिहासीक स्थळांची माहिती असलेले फलक शहरात ठिकठिकाणी लावले जाणार आहेत. प्रेक्षणियस्थळांची माहिती, नगरपासूनचे अंतर असा उल्लेख त्यावर असणार आहे. ऐतिहासीक शहराची माहिती सांगणारी पुस्तिकाही काढली जाणार आहे. शहरातील व्यापारी, प्रतिष्ठीतांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. प्रत्येक शनिवारी व रविवारी पर्यटनासाठी शहर बससेवा सुरू केली जाणार आहे. नगर शहर दर्शन बससेवा असे तिचे नाव असेल. शनिवार,रविवार या दोन दिवस सरकारी कार्यालये तसेच शाळांना सुट्टी असते. त्यांच्यासाठी ही बससेवा सुरू केली जाणार आहे. (प्रतिनिधी) शहर व परिसरात अनेक पर्यटनस्थळे आहेत. मात्र त्याची माहिती नसल्याने शहरातून जाणारे परगावचे लोक तसेच पुढे जातात. त्यामुळे मुख्य महामार्गावरही माहिती फलक लावले जाणार आहेत. त्यातून पर्यटनस्थळाचा विकास तर होईलच पण त्या परिसरातील आर्थिकस्तरही उंचावणार आहे. - किशोर डागवाले, सभापती

Web Title: Ten million for city tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.