दहा दिवसांच्या चिमुरडीस वडिलांनीच पाजले विष

By Admin | Updated: April 25, 2017 02:04 IST2017-04-25T02:04:23+5:302017-04-25T02:04:23+5:30

वसमत तालुक्यातील बोराळा येथे पुन्हा मुलगीच झाली म्हणून पित्याने अवघ्या १० दिवसांच्या चिमुरडीस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Ten days of chimardis father only | दहा दिवसांच्या चिमुरडीस वडिलांनीच पाजले विष

दहा दिवसांच्या चिमुरडीस वडिलांनीच पाजले विष

कौठा/कुरूंदा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील बोराळा येथे पुन्हा मुलगीच झाली म्हणून पित्याने अवघ्या १० दिवसांच्या चिमुरडीस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
रामकिशन शिवाजी जाधव (२४) याचा विवाह चार वर्षांपूर्वी अंजना (२३) हिच्याशी झाला. त्यांना पहिले अपत्य मुलगी झाली. सध्या ही मुलगी ऋतुजा अडीच वर्षांची असून, दहा दिवसांपूर्वी दुसरी मुलगीच झाली. रामकिशनला मुलगा हवा होता; परंतु मुलगी झाल्याने चिडलेला रामकिशन पत्नी व १० दिवसांच्या वैष्णवी हिला भेटण्यासाठी रविवारी दुपारी ३.३०च्या सुमारास वाघी येथे सासुरवाडीला आला.
तेथे त्याने वैष्णवीला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र कुटुंबीयांनी तिला तातडीने विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अंजनाने दिलेल्या फिर्यादीवरून रामकिशनविरूद्ध कलम ३०७ नुसार कुरूंदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Ten days of chimardis father only