शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 04:25 IST

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ तर मराठवाड्यातील काही भागात किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५़१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

पुणे  - कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ तर मराठवाड्यातील काही भागात किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५़१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.आसाम, मेघालय आणि त्रिपुरा येथे जोरदार पाऊस होत आहे़ पश्चिम बंगाल, झारखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाना, चंदीगड, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, रायलसीमा, तमिळनाडू, दक्षिण कर्नाटक, केरळ येथे मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़७ ते १० मे दरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़ ७ ते १० मेदरम्यान विदर्भात एक-दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) :पुणे ४०़२, लोहगाव ४१़३, कोल्हापूर ३८़१, महाबळेश्वर ३२़६, मालेगाव ४४़४, नाशिक ३९़३, सांगली ३९़९, सातारा ४१़१, सोलापूर ४२़६, मुंबई ३४़२, सातांक्रूझ ३४, अलिबाग ३६़४, रत्नागिरी ३३़४, पणजी ३५़१, डहाणू ३४़७, औरंगाबाद ४१़६, परभणी ४४, अकोला ४५़१, अमरावती ४४, बुलडाणा ४१़५, ब्रह्मपुरी ४५़१, चंद्रपूर ४४़६, गोंदिया ४२़५, नागपूर ४३़७, वर्धा ४४़९, यवतमाळ ४३़५़़़अमरावतीत उष्माघाताचे तीन बळीअमरावती : पाऱ्याने ४५ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला असून उष्णतामानामुळे शनिवारी तीन जण मृतावस्थेत आढळून आले. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वैद्यकीय प्रशासनाने वर्तविली आहे.शनिवारी कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील इर्विन रुग्णालयाच्या फुटपाथवर एका ७० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. गाडगेनगर हद्दीतील शेतशिवारात अनिल हिंमत सिरसाठ (४०) हे मृतावस्थेत आढळून आले. दोन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले. बडनेरा हद्दीतील शिवारात शैलेश शंकर देव्हारे (३०) यांचा मृतदेह आढळून आला. तिन्ही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून त्यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे निश्चित कारण समजेल.मुंबईत दिवसा उनं रात्री उकाडामुंबईचे कमाल तापमान ३४ अंशावर स्थिर आहे. मात्र समुद्री वारे स्थिर होण्यास विलंब होत आहे. परिणामी मुंबई तापत आहे. उष्ण, कोरडे वारे मुंबईकरांना तापदायक ठरत असून, ऊकाडा नागरिकांना घाम फोडत आहे. दिवसा ऊनं आणि रात्री ऊकाडा अशा दुहेरी वातावरणाने मुंबई त्रस्त आहे. सोमवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २६ अंशाच्या आसपास राहील; आकाश अंशत: ढगाळ राहील. मंगळवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTemperatureतापमानHeat Strokeउष्माघात