शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

राज्यातील तंत्र शिक्षण मंडळाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ; येत्या ९ जुलैपासून परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 19:26 IST

परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार

ठळक मुद्देइतर वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टपासून सुरू होणार

पुणे  : राज्यातील तंत्रनिकेतनच्या अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र पदविका अभ्यासक्रमासह इतर पाच अभ्यासक्रमांच्या शेवटच्या सत्राच्या व शेवटच्या वर्षीची परीक्षा येत्या ९ जुलैपासून घेण्यात येणार असून परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे,असे तंत्र शिक्षण मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व अभ्यासक्रमाच्या शेवट्या सत्र किंवा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण मंडळाच्या विद्वत समितीची बैठक नुकतीच पार पडली. त्यात विविध परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यायच्या याबाबत नियोजन करण्यात आले. त्यावर मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर  महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने परीक्षांचे वेळापत्रक प्रसिध्द केले असून त्यात सहा सत्राच्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील सहावे सत्र, दोन वर्षाच्या औषधनिर्माण अभ्यासक्रमातील द्वितीय वर्ष, तीन वर्षाच्या मायनिंग अभ्यासक्रमातील तृतीय वर्ष, आठ सत्राच्या पार्टटाईम पदविका अभ्यासक्रमातील आठवे सत्र आणि शासन मान्य अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाचे अंतिम सत्र या अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे नमूद केले आहे.

 शेवटच्या सत्राच्या किंवा शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे काही विषय बॅकलॉग राहिले आहेत. त्यांची परीक्षा १ ते ८ जुलै दरम्यान होणार आहे. ही परीक्षा संस्था स्तरावर घेण्यात येणार आहे. अंतिम सत्राचा/ वर्षाचा अभ्यासक्रम १३ मार्चपर्यंत ९० टक्के पूर्ण झाला होता. त्यावरून परीक्षा घेऊन गुण दिले जाणार आहेत. तर, इतर सत्राच्या किंवा वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुर्वीच्या सत्राच्या गुणांवर व चालू सत्रातील अंतर्गत मूल्यांकनावर गुण दिले जाणार आहेत.  ----------- तृतीय सत्रात किंवा पाचव्या सत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रथम द्वितीय व तृतीय सत्रातील बॅकलॉगचे विषयात २०२०-२१ च्या पहिल्या सत्रात उत्तीर्ण होणे बंधनकारक राहणार आहे. इतर वर्षाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर, नव्याने प्रथम वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग येत्या १ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय