शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
Manoj Jarange Patil Morcha Live: मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल; हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे आझाद मैदानाकडे
3
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
4
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
5
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
6
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
7
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
8
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
9
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
10
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
11
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
12
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
13
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
14
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
15
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
16
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
17
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
18
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
19
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
20
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात

शिक्षकांनी चाकोरीबाहेर जाऊन विचार करावा

By admin | Updated: June 19, 2014 03:04 IST

शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे तसेच विद्यार्थ्यांना नवनिर्मितीसाठी उत्तेजन देण्याकडे शिक्षकांचा कल असायला हवा. नवनिर्मिती व उद्योजकतेचे शिक्षण त्यांना मिळण्याची गरज आहे

पुणे : शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे तसेच विद्यार्थ्यांना नवनिर्मितीसाठी उत्तेजन देण्याकडे शिक्षकांचा कल असायला हवा. नवनिर्मिती व उद्योजकतेचे शिक्षण त्यांना मिळण्याची गरज आहे. त्या दृष्टीने शिक्षकांनी चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे, असे मत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.शालेय शिक्षण विभाग, इस्रायलचा मुंबईतील दूतावास आणि आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन, मुंबई यांच्यावतीने बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये आयोजित दोनदिवसीय महा-इस्रायल शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ या वेळी इस्रायलचे मुंबईतील उच्चाधिकारी जोनाथन मिलर, शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे, शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम, आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या अपर्णा शिवकुमार आदी उपस्थित होते. दर्डा म्हणाले, इस्रायल व भारत या दोन्ही देशांमध्ये अनेक समान गोष्टी आहेत. तसेच वैविधताही आहे. इस्रायल आकाराने छोटा असल्याने नैसर्गिक स्त्रोत खूप कमी आहेत. मात्र नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धतीमुळे त्यांनी कृषी, माहिती तंत्रज्ञान, संशोधन अशा विविध क्षेत्रांत मोठी झेप घेतली आहे़ शाळेत प्रवेश केल्यापासूनच तेथील विद्यार्थ्यांना नावीन्यता आणि उद्योजकतेबाबत प्रोत्साहन दिले जाते. चाकोरीबाहेर जाऊन ते विचार करतात. त्यामुळे इस्रायलकडून खूप शिकण्यासारखे आहे. त्यादृष्टीने महा-इस्रायल ही कार्यशाळा म्हणजे शिक्षकांसाठी एक खजिनाच आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्यात संशोधनवृत्ती जागृत करायला हवी. कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले़ या वेळी मिलर, अश्विनी भिडे आणि एस. चोक्कलिंगम यांनीही मार्गदर्शन केले़ कार्यशाळेत राज्यातील १५० शिक्षक तसेच शिक्षण विभागाच्या विविध संस्थांचे ५० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. इस्रायलहून आलेले शिक्षणतज्ज्ञ डॉ. शहाफ गाल, दोव्ह कुपरमन आणि ओजस वाल्डमन आणि भारतातील हेमंत लागवणकर हे मार्गदर्शक आहेत. कार्यक्रमादरम्यान ‘नावीन्यपूर्णतेसाठी शिक्षण आणि शिक्षणातील नावीन्यता’ तसेच ‘इंडो-इस्रायल बिझनेस : शिक्षणक्षेत्र विशेष’ या दोन अहवालांचे दर्डा यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. (प्रतिनिधी)