शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

संस्थाचालकांना शिक्षक भरतीचे रान मोकळे करून देण्याचा शिक्षक आमदारांचा प्रयत्न- विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 21:47 IST

नागपूर- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशनानुसारच मुंबईच्या चेंबूरमधील डॉ. भीमराव आंबेडकर शाळेतील शिक्षिका जयश्री ढोरे यांचे समायोजन नागपूर येथील नवयुग विद्यालयात करण्यात आले आहे.

नागपूर- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशनानुसारच मुंबईच्या चेंबूरमधील डॉ. भीमराव आंबेडकर शाळेतील शिक्षिका जयश्री ढोरे यांचे समायोजन नागपूर येथील नवयुग विद्यालयात करण्यात आले आहे. मात्र शिक्षिका ढोरे यांचे प्रकरण पुढे करून काही संस्थाचालकांना शिक्षक भरतीचे रान मोकळे करून देण्याचा प्रयत्न काही शिक्षक आमदार करीत आहेत, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.शिक्षक भरती करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे प्रकार होत असतात. शिक्षक भरतीसाठी काही संस्थाचालक शिक्षकांकडून लाखो रुपये उकळण्याचे प्रकार घडतात, अशा तक्रारी शिक्षकच करत आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी व शिक्षक भरतीमधील तथाकथित भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकारने शिक्षकांची भरती केंद्रिभूत पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. परंतु या निर्णयाच्या विरोधात काही संस्थाचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे याचिका केल्या.या याचिकांची सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने शिक्षक निवड पद्धती करताना याचिका कर्ता शिक्षण संस्थांना विहित कार्यपद्धती अवलंबून शिक्षक पदे भरण्याची परवानगी दिली. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शासनाच्या पारदर्शक शिक्षक निवडीच्या पध्दतीचा मार्ग मोकळा झाला. परंतु शिक्षक निवड ही शिक्षण संस्थांमध्ये शासनाच्या केंद्रिभूत पद्धतीने होऊ नये यासाठी काही शिक्षण संस्थांचा प्रयत्न होता. त्यामुळे राज्य स्तरावर अतिरिक्त शिक्षक उपलब्ध असल्याचे राज्य सरकारने न्यायालयीन सुनावनीच्यावेळी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.शिक्षण संस्थांना जाहिरातीच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यास विलंब होऊ शकतो, त्यामुळे हा विलंब टाळण्यासाठी कमी वेळेत अतिरिक्त शिक्षकांच्या यादीतून आवश्यक असलेले शिक्षक उपलब्ध करून देणे शक्य होते. त्यामुळे संबंधित शिक्षण संस्थांनी त्यांच्या संस्थांमधील रिक्त पदांची माहिती कळविल्यानंतर शासकीय यंत्रणेने अतिरिक्त शिक्षक यादीतून आवश्यक असलेले शिक्षक सदर शिक्षण संस्थांना उपलब्ध करुन द्यावेत असा निर्णय न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या निर्णयानुसार ढेरे यांचे समायोजन करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील शिक्षक हे भाषा व समाजशास्त्र विषयाचे होते तर काही शिक्षक विज्ञान विषयाचे आहेत. मात्र गणित विषयाकरीता एकही शिक्षक नागपूर विभागात अथवा जवळपासच्या विभागात उपलब्ध नसल्यामुळे संबंधित शिक्षण संस्थेस मुंबई येथून शिक्षक उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र या समायोजन प्रक्रियेचा अपप्रचार करुन काही आमदार संस्थाचालकांना भरतीचे रान मोकळे करुन देण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि केंद्रीयभूत शिक्षक निवड पद्धतीला विरोध करीत आहेत, अशी टीकाही तावडे यांनी केली.विद्यार्थिनीला उठाबशाची शिक्षा करणाऱ्या मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्यात आलेकोल्हापूरच्या भावेश्वरी संदेश विद्यालयाच्या 8वीच्या विद्यार्थिनीला उठाबशा काढण्याची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्याचे आदेश संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कानूरबुद्रुक येथील भावेश्वरी संदेश विद्यालयात 8 वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला उठाबशा काढण्याची शिक्षा मुख्याध्यापिका आश्विनी देवण यांनी दिली. हा गंभीर प्रकार निदर्शनास आल्यानंतर या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडून ताबडतोब चौकशी अहवाल मागविण्यात आला. यानंतर मुख्याध्यापिका देवण यांचे वेतन थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे