शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

शैक्षणिक काम नसतानाच निवडणूक कामासाठी बोलवा; शिक्षकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:29 IST

शैक्षणिक काम नसताना निवडणुकीच्या कामासाठी बोलवावे, या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: शैक्षणिक काम नसताना निवडणुकीच्या कामासाठी बोलवावे, या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. विधानसभेची निवडणूक होती, त्यावेळी वार्षिक परीक्षा सुरू होती. तेव्हादेखील शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी जावे लागले. आता शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. मुंबईमध्ये महापालिकेच्या तसेच खासगी अनुदानित शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी हजर होण्याचे आदेश प्राप्त होत आहेत. हा प्रकार वर्गावरील शिक्षकांना  वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. तसेच २२ फेब्रुवारी २०२४ च्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या  आदेशाकडे महापालिकेने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे शिक्षक संघटनांनी म्हटले आहे.

१२ जून रोजी मुंबई महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडून १५ जून २०२५ पर्यंत निवडणुकीच्या कार्यालयात हजर होण्याच्या आदेश प्राप्त झाले. आता महापालिकेसोबत खासगी अनुदानित शिक्षकांनादेखील याबाबत आदेश प्राप्त झाले असल्याचे अनेक शिक्षकांनी सांगितले. जोगेश्वरी येथील २ खासगी अनुदानित शिक्षण संस्थांतील ३५, तर महापालिकेच्या घाटकोपर येथील विविध शाळांमधून ११० शिक्षकांना विलेपार्ले येथे  निवडणुकीच्या कामासंदर्भात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे महापालिकेने दुर्लक्ष करू नये, प्रहार शिक्षक संघटना महापालिकेचे अध्यक्ष विकास घुगे म्हणाले. अनुदानित शाळाही नुकत्याच सुरू झाल्या आहेत. वर्गावर असलेले शिक्षक निवडणूक कामावर गेल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येईल, असे पुरोगामी शिक्षक संघटना अध्यक्ष तानाजी कांबळे म्हणाले.

‘त्या’ आदेशाकडे दुर्लक्षशिक्षकांना शैक्षणिक काम नसेल, अशा दिवशीच त्यांना मतदार यादीच्या पुनरीक्षणाचे काम देता येईल, या सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुकीच्या कामाबाबत विचार करावा, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी २२ फेब्रुवारीला पालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. तरीही या आदेशाकडे दुर्लक्ष होत आहे, असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूक 2024Teacherशिक्षक