शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

३,२०० कोटींचा टीडीएस घोटाळा, ४४७ कंपन्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 06:21 IST

४४७ कंपन्यांचा सहभाग असलेला ३,२०० कोटी रुपयांचा टीडीएस घोटाळा प्राप्तिकर विभागाने उघडकीस आणला आहे. घोटाळेखोर कंपन्यांनी कर्मचा-यांच्या वेतनातून कर कापून तर घेतला. मात्र, तो सरकारकडे जमाच केला नाही. त्याऐवजी त्यांनी हा पैसा आपल्या व्यवसायाकडे वळविला.

मुंबई  -  ४४७ कंपन्यांचा सहभाग असलेला ३,२०० कोटी रुपयांचा टीडीएस घोटाळा प्राप्तिकर विभागाने उघडकीस आणला आहे. घोटाळेखोर कंपन्यांनी कर्मचा-यांच्या वेतनातून कर कापून तर घेतला. मात्र, तो सरकारकडे जमाच केला नाही. त्याऐवजी त्यांनी हा पैसा आपल्या व्यवसायाकडे वळविला. हा प्रकार गेल्या एका वर्षात घडला आहे. प्राप्तिकर विभागाच्या टीडीएस शाखेने या कंपन्यांविरुद्ध खटल्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काही प्रकरणांत वॉरंटही जारी करण्यात आले. या गुन्ह्यासाठी प्राप्तिकर कायद्यात किमान तीन महिन्यांची सक्तमजुरी, तसेच जास्तीतजास्त ७ वर्षांच्या तुरुंगवासासह दंडाची तरतूद आहे.आरोपींमध्ये बिल्डरांचा प्रामुख्याने समावेश आहे. यापैकी एका बिल्डराचे राजकीय लागेबांधे असून, कर्मचाºयांच्या वेतनातून करापोटी त्याने कापलेल्या १०० कोटींचा अपहार केला आहे. इतर आरोपींत चित्रपटनिर्मिती संस्था, पायाभूत सेवा क्षेत्रातील कंपन्या, स्टार्ट अप कंपन्या, फ्लाय बाय नाइट आॅपरेटर यांचा समावेश आहे.एका बंदराचा विकास करणाºया पायाभूत क्षेत्रातील कंपनीने १४ कोटीरुपये परस्पर वळविले आहेत.आयटी सोल्युशन प्रोव्हायडर एका ‘एमएनएस’ने ११ कोटी रुपयांचा कर सरकारकडे जमा केलेला नाही.अधिकाºयाने सांगितले की, हा घोटाळा एप्रिल २०१७ पासूनच्या आहे. काही आरोपींना अटक करण्याची आमची तयारी आहे. कर्मचाºयांच्या वेतनातून टीडीएस कापून ठरावीक मुदतीत तो सरकारकडे जमा करण्याची जबाबदारी कंपन्यांवर आयकरकायद्यानुसार आहे.पैसे भरण्यास नकारअनेक कंपन्यांनी हा पैसा खेळते भांडवल म्हणून वापरला. काही कंपन्यांनी ५० टक्के रक्कम वापरून घेतली. यातील काही कंपन्यांनी दिलगिरी व्यक्त करून पैसे भरण्याची तयारी दर्शविली आहे. काही कंपन्यांनी मात्र आर्थिक अडचणीचे कारण देऊन पैसे भरण्यास नकार दिला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्र