शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
4
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
5
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
6
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

टीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष भाजपा सहकार आघाडीच्या सात जिल्ह्यांचे ‘विभागीय संयोजक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 7:47 PM

ठाणे: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके (टीडीसीसी) उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे  यांच्यावर भाजपाच्या महाराष्ट्र  प्रदेश सहकारी आघाडीच्या ‘विभागीय संयोजक’ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यास अनुसरून या आघाडीचे प्रभारी अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर व संयोजक संजय भेंडे यांनी तसे लेखी पत्र देऊन ठाणेसह जिल्ह्यासह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर आदी ...

ठळक मुद्देटीडीसीसी बँकेचे मागील काही वर्षांपासून एकमेव भाजपाचे संचालकमहाराष्ट्र राज्य सहकारी संघच्या संचालकपदी नुकतीच निवडभाजपाने आता त्यांच्यावर या सात जिल्ह्यांच्या विभागीय संयोजक पदाची जबाबदारी

ठाणे: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके (टीडीसीसी) उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे  यांच्यावर भाजपाच्या महाराष्ट्र  प्रदेश सहकारी आघाडीच्या ‘विभागीय संयोजक’ पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यास अनुसरून या आघाडीचे प्रभारी अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर व संयोजक संजय भेंडे यांनी तसे लेखी पत्र देऊन ठाणेसह जिल्ह्यासह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर आदी सात जिल्ह्यांची जबाबदारी कुऱ्हाडे  यांना बहाल केली आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी संघच्या संचालकपदी नुकतीच निवड झालेले कुऱ्हाडे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांपैकी सर्वात श्रीमंत असलेल्या या टीडीसीसी बँकेचे मागील काही वर्षांपासून एकमेव भाजपाचे संचालक आहेत. दीर्घकाळापासून या बँकेत भाजपाची बाजू मांडणारे कुऱ्हाडे यंदा उपाध्यक्ष पदी असताना भाजपाने आता त्यांच्यावर या सात जिल्ह्यांच्या विभागीय संयोजक पदाची जबाबदारी मिळाली आहे. सहकारी क्षेत्रातील त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन कुऱ्हाडे यांना विभागीय संयोजकाची जबाबदारी मिळाली. सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या या विभागीय संयोजक पदाचा मान ठाणे जिल्ह्यास मिळाल्यामुळे भाजपाच्या सहकार क्षेत्रात चैतन्याचे वातावरण आहे.

टॅग्स :thaneठाणे