शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'पॅकेज'वर माझा विश्वास नाही, पण मदतीशिवाय कुणी राहणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 11:55 IST

CM Uddhav Thackeray in Ratnagiri: तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर; रत्नागिरीत प्रशासनासोबत आढावा बैठक

रत्नागिरी: विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नव्हे, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांसाठी पॅकेजची घोषणा कधीपर्यंत करणार, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर 'पॅकेज'वर माझा विश्वास नाही, पण मदतीशिवाय कुणी राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. रत्नागिरीत आढावा बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नाही; प्रत्यक्ष जमिनीवर उतरलोय; मुख्यमंत्र्यांचा मोदींना टोलाकेंद्राच्या निकषप्रमाणे मदत लगेचच सुरू करू. एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे निकष बदलण्यावर अद्याप तरी काही निर्णय झालेला नाही. आतापर्यंत ९० ते ९५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेतला जाईल. सध्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. कोणत्या निकषांनुसार मदत करायची याचा निर्णय आढाव्यानंतर घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. माझा दौरा चार तासांचा आहे. फोटोसेशन करण्यात मला रस नाही. त्याची गरज मला वाटत नाही. कारण मी स्वत: फोटोग्राफर आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला. हे फडणवीसांना तर पटेल काय? मोदींना कानपिचक्या, देवेंद्रांचे कान टोचलेपॅकेजवर माझा विश्वास नाही. पण मदतीशिवाय कुणी राहणार नाही. सरकार वादळग्रस्त भागातील जनतेसोबत आहे. विरोधकांना उत्तर द्यायला मी इथे आलो नाही. कोकणातील जनतेला दिलासा देण्यासाठी आलो आहे. हेलिकॉप्टरमधून पाहणी करून नाही गेलो. लोकांना भेटायला आलो आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील वादळग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी चिमटा काढला. इथल्या विरोधी पक्षसारखे बोलणार नाही. माझा पंतप्रधानांवर विश्वास आहे. ते लवकरच महाराष्ट्रासाठीदेखील मदत जाहीर करतील, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ