शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Tauktae Cyclone: चक्रीवादळामुळे ४६ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; ठाणे जिल्ह्याला सर्वाधिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 08:36 IST

३४ लाख ग्राहकांचा पुरवठा सुरळीत, १० हजार ७५२ गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान 

मुंबई : ‘तौक्ते’ चक्रीवादळाने व मुसळधार पावसामुळे राज्यातील ४६ लाख ४१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. ३४ लाख १४ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे व राज्यातील इतर जिल्ह्यांतील १० हजार ७५२ गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान झाले. ६ हजार ४० गावांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका ठाणे जिल्ह्याला बसला. ७ लाख ८५ हजार ५१९ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. मंगळवारी संध्याकाळपर्यंत जवळपास ५ लाख ५० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. दुसरा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला. यामुळे ७ लाख ७३ हजार ७६० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. मंगळवारी संध्याकाळपर्यंत जवळपास ५ लाख १० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. पालघर जिल्ह्यात ५ लाख ८८ हजार ७४३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. मंगळवारी संध्याकाळपर्यंत जवळपास २ लाख ४४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

सी-लिंकवरील वाहतूक सुरूअरबी समुद्रात उठलेल्या चक्रीवादळामुळे सुरक्षेच्या कारणात्सव वांद्रे - वरळी सी लिंकवरील वाहतूक तीनएक दिवस बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता वादळाचा आणि पावसाचा जोर ओसरल्यानंतर मंगळवारी दुपारी सी लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

मोनो रेल सुरूमुंबईत चक्रीवादळामुळे वेगाने वारे वाहात होते. परिणामी चेंबूर - वडाळा - संत गाडगे महाराज चौकदरम्यान धावणारी मोनोरेल सोमवारी बंद ठेवण्यात आली होती. मात्र, मंगळवारी पावसाचा आणि चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर मोनोरेल सुरू करण्यात आली, असे एमएमआरडीएच्या वतीने सांगण्यात आले.

दुसऱ्या दिवशीही नेटवर्कची प्रतीक्षातौक्ते चक्रीवादळाचा फटका दूरसंचार क्षेत्रालाही बसला. खासगी कंपन्यांनी तत्काळ आपली सेवा पूर्ववत केली असली, तरी सरकारी दूरसंचार कंपनी एमटीएनएल आणि बीएसएनलचे ग्राहक मात्र दुसऱ्या दिवशीही नेटवर्कच्या प्रतीक्षेत होते. सोमवारी पश्चिम उपनगरातील बहुतांश भागांत एमटीएनएलची सेवा विस्कळीत झाली. लँडलाईनबरोबरच मोबाइललाही नेटवर्क नसल्याने ग्राहक हतबल झाले. मंगळवारी सायंकाळपर्यंत स्थिती कायम होती. दरम्यान, यासंदर्भात एमटीएनएलच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

मुंबई विमानतळावरील वाहतूक सुरळीततौक्ते चक्रीवादळाचा जोर ओसरताच सोमवारी रात्री १० नंतर मुंबई विमानतळावरील वाहतूक सुरू करण्यात आली. मंगळवारी गुजरात वगळता अन्य विमानसेवा सुरळीत सुरू होत्या.सोमवारी चक्रीवादळ मुंबईच्या जवळ पोहोचल्यानंतर सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मुंबई विमानतळ तब्बल ११ तास बंद ठेवावे लागले. वादळाची तीव्रता इतकी होती की, सकाळी मुंबईच्या दिशेने निघालेली सात विमाने इतरत्र वळवावी लागली, तर ५६ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. रात्री १० नंतर विमान उड्डाणांना परवानगी देण्यात आली.रात्री विमानतळ सुरू झाल्यानंतर ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने पहिले लँडिंग केले, तर एअर इंडियाच्या विमानाला पहिल्या उड्डाणाचा मान देण्यात आला. १८ मे रोजी मुंबई विमानतळावरील उड्डाणे वेळापत्रकानुसार सुरू होती, अशी माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, वादळ गुजरातच्या दिशेने सरकल्यामुळे खबरदारी म्हणून राजकोट, अहमदाबाद आणि बडोदा विमानतळ बंद ठेवण्यात आले.

पालघर जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे सुरू‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागाबरोबरच डहाणू, वाडा, विक्रमगड, तलासरी आदी ग्रामीण भागालाही मोठा भटका बसला आहे. ग्रामीण भागात उन्हाळी भातशेतीबरोबरच आंबा, चिकू, जांभूळ बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शेकडो घरांवरील पत्रे वादळात उडून गेले असून अनेकांच्या घरांवर झाडे पडल्याने नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाच्या वतीने सुरू आहेत. मात्र, किती नुकसान झाले ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ