शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’ चे अपयश झाकण्यास टँकरची मागणी दाबली जात आहे; काँग्रेसचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 09:13 IST

राज्यभरात दुष्काळाची तीव्रता प्रचंड वाढली असताना चाऱ्याविना पशू व पाण्याविना जनतेला तडफडत ठेवण्याचे काम सरकार करत आहे.

मुंबई : राज्यभरात दुष्काळाची तीव्रता प्रचंड वाढली असताना चाऱ्याविना पशू व पाण्याविना जनतेला तडफडत ठेवण्याचे काम सरकार करत आहे. हजारो टँकरची मागणी असताना जलयुक्त शिवार योजनेचे सपशेल अपयश आणि त्यातील भ्रष्टाचार जनतेला जाणवेल म्हणून टँकरची मागणी पूर्ण न करता ती दाबून ठेवण्याचे काम केले जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.सावंत म्हणाले, राज्यात दुष्काळाची परिस्थिती पाहता दहा हजारांपेक्षाही अधिक टँकरची मागणी अनेक गावातून येत आहे. आजवर पाणी पुरवठा विभागाच्या आकडेवारीनुसार केवळ ५१७४ टँकरने पाणी दिले जात आहे. गावातून आलेली मागणी लालफितीतच अडकवून ठेवण्याचे सरकारचे निर्देश असल्याचे समजते. गावा-गावात एका टँकरच्या मागे गावकरी पाण्यासाठी तुटून पडल्याचे चित्र दिसत आहे. हे चित्र अत्यंत विदारक आणि संतापजनक असून केवळ जलयुक्त शिवारमध्ये खर्च केलेले हजारो कोटी रुपये कोणाच्या घशात गेले हा प्रश्न जनताविचारेल म्हणूनच टँकरची मागणी पूर्ण केली जात नाही. असे असले तरी जलयुक्त शिवारचे अपयश व त्यातील भ्रष्टाचाराची लक्तरे ही वेशीवर टांगली गेली आहेत हे पूर्पणपणे सत्य आहे.

टॅग्स :Waterपाणीcongressकाँग्रेस