माजी मंत्री तानाजी सावंत यांचा वाकाव (ता. माढा) येथील बंगला पुराच्या पाण्याखाली गेला आहे. याचा व्हिडीओ काढण्यात आला असून यामध्ये त्यांच्या घराबाहेरील ट्रॅक्टर, दोन फॉर्च्युनर पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे.
बोटीने त्यांच्या घरातील सदस्यांना वाचविण्यात आले आहे. अनेकजण बंगल्याच्या टेरेसवर थांबलेले आहेत. त्यांनाही बोटीने सुखरूप ठिकाणी नेण्यात येणार आहे. राज्यभरात भयानक पाऊस झाला आहे. हजारो गावे पाण्याखाली गेली आहेत. सीना नदीला आला महापूर आल्याने सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातही मोठी अतिवृष्टी झाली आहेत. यामध्ये सुमारे 2 लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. 2 लाख 22 हजार 881 शेतकरी बाधित झाले आहेत. 11 तालुक्यातील तब्बल 729 गावांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसला आहे. या महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 6 लोकांचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.