शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण नाट्याचं गौडबंगाल; अनेक प्रश्न अनुत्तरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 09:11 IST

अपहरणाची गोष्ट सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास सुरू झाली. अवघ्या पाच तासांत ऋषिराज बँकॉकला जात असताना अंदमानपासून सुखरूप रात्री नऊच्या सुमारास पुण्यात आला.

पुणे - माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत अपहरण नाट्यातील प्रत्येक घडामोडीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुळात खरंच सावंत कुटुंबीयांना मुलगा बँकॉकला जाणार आहे, हे माहिती नव्हते? ज्यावेळी ऋषिराज मित्रांसोबत आहे हे तानाजी सावंत पत्रकार परिषदेत सांगतात, त्यावेळी चार्टर्ड परत पुणे विमानतळावर बोलावण्याएवढे हे प्रकरण गंभीर होते का? पोलिसांनीदेखील कोणतीही पडताळणी न करता तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल कसा केला? यासाठी पोलिसांवर दबाव होता का? असे एक ना अनेक प्रश्न या अपहरण नाट्यानंतर उपस्थित होत आहेत. 

तक्रार देण्याचे कारण काय?ऋषिराज सावंत यांचे अपहरण झाल्याची फिर्याद देणारे जेएसपीएम शिक्षण संस्थेत स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख राहुल सुभाष करळे (४७, रा. सावंत विहार, मोरे बागेजवळ, कात्रज) यांनी कुणाच्या सांगण्यावरून ही तक्रार दिली. जर ऋषिराज कारमध्ये बसून संस्थेच्या कार्यालयातूनच बाहेर पडले होते तर, तक्रार देताना भारतातून अपहरण केल्याची तक्रार देण्याचे कारण काय? हे प्रश्नदेखील महत्त्वाचे आहेत. 

तानाजी सावंतांची चुप्पीअपहरणाची गोष्ट सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास सुरू झाली. अवघ्या पाच तासांत ऋषिराज बँकॉकला जात असताना अंदमानपासून सुखरूप रात्री नऊच्या सुमारास पुण्यात आला. या पाच तासांत यंत्रणेने ज्याप्रमाणे ‘चोख’ काम केले, ते कशामुळे? सावंतांनी मुख्यमंत्री कार्यालयापासून, उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, पोलिस आयुक्त, सहपोलिस आयुक्त या सगळ्यांना फोनाफोनी करून स्वत: पोलिस आयुक्तालयात ठिय्या मांडला होता.

विमानाचे ७८ लाख ५० हजार रुपये कसे भरले?ऋषिराज यांनी चार्टर्ड प्लेन विमानाचे ७८ लाख ५० हजार रुपये ‘आरटीजीएस’द्वारे भरले होते. ही रक्कम कशी अदा झाली, याचीह माहिती गुन्हे शाखेकडून घेण्यात येणार आहे. ‘क’ समरी अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर दाखल झालेला अपहरण प्रकरणाचा गुन्हा रद्दबातल केला जाईल, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली.

खासगी विमानाने मित्रांसमवेत व्यावसायिक कामासाठी बँकाँकला निघालो होतो. बँकॉकला निघाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यास ते नकार देतील. त्यामुळे त्यांना माहिती दिली नाही, असे ऋषिराज यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Tanaji Sawantतानाजी सावंतPoliceपोलिस