सेनेसोबतची चर्चा संपलेली नाही!

By Admin | Updated: November 16, 2014 02:11 IST2014-11-16T02:11:26+5:302014-11-16T02:11:26+5:30

: महाराष्ट्रात भाजपाने सरकार स्थापन करून विश्वासमतही जिंकले; पण सेनेसोबतची चर्चा अजून संपलेली नाही.

Talk with Senna is not over! | सेनेसोबतची चर्चा संपलेली नाही!

सेनेसोबतची चर्चा संपलेली नाही!

शहांची स्पष्टोक्ती
औरंगाबाद : महाराष्ट्रात भाजपाने सरकार स्थापन करून विश्वासमतही जिंकले; पण सेनेसोबतची चर्चा अजून संपलेली नाही. चर्चा सुरूच असल्याची माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, एका युवा नेतृत्वाला आम्ही राज्यात मुख्यमंत्रिपदाची संधी दिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कृषी, उद्योग आदी सर्वच क्षेत्रंमध्ये भरारी घेईल. उद्योग क्षेत्रतील गुंतवणुकीत महाराष्ट्र मागील 3क् वर्षामध्ये आघाडीवरच होता. यापुढेही अशीच गुंतवणूक होणार आहे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
शुक्रवारपासून औरंगाबाद-जालना जिल्ह्यांच्या दौ:यावर असलेले शहा शनिवारी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राजकारणात प्रत्येक विषय मीडियासमोर सुटत नसतो. शिवसेनेची आमच्या सोबत असलेली नाराजी माध्यमांसमोर दूर होणार नाही. सेनेसोबत कालसुद्धा चर्चा सुरू होती. यापुढेही सुरू राहणारच आहे. राष्ट्रवादीचे समर्थन महाराष्ट्रात घेण्यात आले, भाजपाकडे बहुमत नाही आदी प्रश्नांची उत्तरे देण्यास त्यांनी नकार दिला. वेळ आल्यावर सर्वच प्रश्नांची उत्तरे मीडियाला 
मिळतील़ (प्रतिनिधी)
 
राज्यात विश्वासदर्शक ठरावावेळी राष्ट्रवादीने भाजपाला पडद्याआडून मदत केली. त्याचे अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत. या पाश्र्वभूमीवर शहा काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीचा कुठलाही उल्लेख केला नाही.

 

Web Title: Talk with Senna is not over!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.