शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

"एकदाच काय ते व्हिडीओ, पेन ड्राईव्ह बाहेर काढा, पण धमक्या द्यायचं बंद करा’’, अजित पवारांनी विरोधकांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:20 IST

Ajit Pawar News: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात हनिट्रॅप प्रकरण चांगलंच गाजत आहे. तसेच त्यावरून विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून वेगळे दावे केले जात आहेत. आपल्याकडे या प्रकरणाचे व्हिडीओ आहेत, पेन ड्राईव्ह आहेत, असे इशारे अनेक नेत्यांकडून दिले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी विरोधकांनी इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात हनिट्रॅप प्रकरण चांगलंच गाजत आहे. तसेच त्यावरून विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून वेगळे दावे केले जात आहेत. आपल्याकडे या प्रकरणाचे व्हिडीओ आहेत, पेन ड्राईव्ह आहेत, असे इशारे अनेक नेत्यांकडून दिले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी विरोधकांनी इशारा दिला आहे. ’एकदाच काय ते व्हिडीओ, पेन ड्राईव्ह बाहेर काढा, कुणाला हनिट्रॅपची काय माहिती आहे ते बाहेर येऊ द्या, पण धमक्या द्यायचं बंद करा’ असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांशी संवादा साधत असताना याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, असे दावे करणं हे विरोधकांचं कामच आहे. ज्यांच्याकडे असे व्हिडीओ आहेत, पेन ड्राईव्ह आहेत, ते बाहेरच येऊद्या, मात्र दम द्यायचं बंद करा.  कुणाकडे काय पेन ड्राईव्ह आहेत. कुणाकडे काय व्हिडीओ आहेत, कुणाकडे आणखी काय माहिती आहे, कुणाकडे हनिट्रॅपच्या संदर्भात काय माहिती आहे, ती सगळी एकदा बाहेर येऊ द्या. त्यावरून कोण कसं वागतंय हे आपल्यालाही समजून जाईल, असं विधान अजित पवार यांनी केलं.

ते पुढे म्हणाले की, वेगवेगळे मान्यवर गेली अनेक वर्षे असे दावे करत आहेत. याबाबत अगदी मागच्या आणि त्याचा आधीच्या सरकारच्या काळातही बोललं जात होतं. आता ह्याही सरकारच्या काळात बोललं जात आहे. तसेच प्रत्येक जण काही तरी पेन ड्राईव्ह दाखवतो आणि म्हणतो हा पाहा पेन ड्राईव्ह. अरे तो पेन ड्राईव्ह दाखवा तरी, लोकांनाही कळू द्या आणि सत्य लोकांसमोर येऊ द्या, असा टोला अजित पवार यांनी लगावला.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीhoneytrapहनीट्रॅप