घ्या खंजीर....अन् लागा कामाला!
By Admin | Updated: September 2, 2014 01:58 IST2014-09-02T01:58:05+5:302014-09-02T01:58:05+5:30
माझंच चुकलं. युद्धाची सारी जबाबदारी मी केवळ ‘रायगडाच्या सरदारा’वर टाकली. तुमचा विचारच केला नव्हता.
घ्या खंजीर....अन् लागा कामाला!
(‘ताबडतोब येऊन भेटा,’ असा खलिता ‘थोरल्या काकां’कडून येताच दादा गडबडले. ‘आपण आबांची मोजलेली उंची बहुधा आवडली नसावी,’ याचा विचार करतच ते ‘काकां’च्या छावणीत डेरेदाखल झाले.)
दादा : (हळूच) काकाùù माझं काही चुकलं का?
काका : (गंभीरपणो) नाही. माझंच चुकलं. युद्धाची सारी जबाबदारी मी केवळ ‘रायगडाच्या सरदारा’वर टाकली. तुमचा विचारच केला नव्हता. काम नसलं की माणूस काहीही बोलतो. असो. आता महत्त्वाचं बोलू. रणधुमाळी सुरू झालीय. आपली शस्त्रं परजायला हवीत.
दादा : (उत्साहनं) होय. होय. ठासून सुरुंग भरलेल्या मुलूख मैदानी तोफा मी ‘सूरत’च्या दिशेने सज्ज ठेवल्यात.
काका : (रोखून बघत) तुम्हाला सुरतेवर हल्ला चढवायचाय की मुंबई प्रांत सांभाळायचाय ?
दादा : वांद्रे परिसरातही आपले कैक सरदार म्यानातून बाहेर काढलेल्या तलवारी तळपवू लागलेत.
काका : (कपाळावर आठय़ा) थांबा. घाई करू नका. आधी तुमचा दुश्मन कोण, हे ओळखा. मग युद्धनीती आखा.
दादा : (काहीतरी आठवल्यासारखं) हां. हां. आलं लक्षात. ‘गनिमांशी तह अन् स्वकीयांशी युद्ध’ हीच तर तुमची खास रणनीती नां. ऐकत आलोय मी लहानपणापासून.
काका : (गालातल्या गालात हसत) हुश्शाùùर आहात. म्हणूनच तर तुम्हाला मी गेली पाच वर्षे मुख्य सिंहासनापासून दूर ठेवलंय. नाही तर माझीही पार वाटùù
दादा : (विषय बदलत) मग आपल्याच स्वकीयांशी लढण्यासाठी यंदा शस्त्रं कोणती वापरायची काका?
काका : (खंजिरांनी भरलेली पोती दाखवत) ही घ्या आपली खास शस्त्रं. यंदा ‘बाबां’च्या टापूतले जेवढे काही सव्वाशे-दीडशे सैनिक असतील, त्या सा:यांसाठी ‘पाठी’मागून हे शस्त्र वापरा. आपले सव्वाशे सैनिक इकडं सुरतेशी लढतील अन् ‘बाबांचे सैनिक’ तिकडं परस्पर खंजिरामुळं धारातिर्थी पडतील, याचं नियोजन करा. चला. लागा कामाला.
(‘सशस्त्र गोणी’सह दादा बाहेर आले. त्यांनी ‘काकां’च्या सरदारांना दीडशे खंजीर वाटले. सारे गेले. मग आपल्या काही ‘खास’ सरदारांना त्यांनी हळूच बोलावलं. खिशात लपविलेले अजून काही खंजीर बाहेर काढले.)
दादा : (कुजबुजत) हे घ्या पंचवीस-तीस खंजीर. आपल्याच काही सरदारांसाठी याचा यंदा गुपचूप वापर करायचाय. ‘मुख्य सिंहासन’ मिळवायचं असेल तर मला माझीही ताकद वाढवावीच लागणार आहे. आलं का लक्षात..मग, लागा कामाला.
- सचिन जवळकोटे