पर्यावरणाची काळजी घ्या

By Admin | Updated: September 27, 2015 05:16 IST2015-09-27T05:16:43+5:302015-09-27T05:16:43+5:30

ध्वनिक्षेपकाच्या जोडीने कार्यकर्त्यांच्या गाड्या, त्यांचे कर्कश हॉर्न, ध्वनिक्षेपकावरून लावली जाणारी मोठ्या आवाजातील गाणी

Take care of the environment | पर्यावरणाची काळजी घ्या

पर्यावरणाची काळजी घ्या

ध्वनिक्षेपकाच्या जोडीने कार्यकर्त्यांच्या गाड्या, त्यांचे कर्कश हॉर्न, ध्वनिक्षेपकावरून लावली
जाणारी मोठ्या आवाजातील गाणी, गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेताना कर्कश आवाजातील वाद्ये,
ढोल, ताशे हे ढकलगाडीवरून वा ट्रकमधून नेल्या जातात. रस्ताभर सगळ््यांनाच त्रास होतो तो वेगळाच.
णपती विसर्जन करताना काळजी घ्यायला हवी. काही प्रांतांम्ये घरातच बादलीभर पाणी घेतात आणि त्यात मूर्ती विसर्जित करतात. ते पाणी बागेमध्ये झाडांना घातले जाते. निर्माल्य खड्डा खणून त्यात घालतात. त्याचे उत्तम खत तयार होते. तेही झाडांनाच घालतात. ज्यांच्या घरामागे विहिरी आहेत ते विहिरीत मूर्तींचे विसर्जन करतात (ते करताना फक्त मूर्तींचे रंग त्रासदायक नाहीत ना हे पाहावे.) गावामध्ये बरीच तळी, तलाव असतात. तेथे त्या तलावांमध्ये मूर्तीविसर्जन केले जाते. नदी असेल तर नदीवर, खाडी, समुद्र जवळ असेल तर त्या ठिकाणी मूर्तींचे विसर्जन होते.
या कोणत्याही ठिकाणी विसर्जन करताना काळजी घ्यावी. मूर्तींची संख्या आणि तलावांची खोली, प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती तलाव उथळ बनवतात. तळाशी प्लॅस्टर आॅफ पॅरिसचा ढीग जमतो. काही वर्षांतच ते तलाव निरुपयोगी ठरू शकतात. नदी, विहिरी, तलावात शाडूच्या मूर्तींचे विसर्जन करावे. मूर्तींच्या रंगामुळे पाणी प्रदूषित होऊन पाण्यातील मासे, जलचर प्राणी, वनस्पती यांच्यावर विपरीत परिणाम होतो. निर्माल्य पाण्याजवळ काठावर टाकले तरी तेथे ते कुजते व पाण्याला दुर्गंधी येऊ शकते. प्लॅस्टिकच्या पिशव्या पाण्यात पडल्यावर त्याचा जलचरांवर वाईट परिणाम होऊ शकतो. पाणी प्यायला येणाऱ्या प्राण्यांच्या पोटातही या पिसव्या जाऊ शकतात. यासाठी निर्माल्य टाकण्यासाठी मोठमोठे रांजण, कलश ठेवावेत.
-----
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे होणारे विसर्जन पाहता मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुुकीचे नियोजन आखले आहे.
-------
चौपाट्या, तळ््यांवरची गर्दी कमी होईल. पाच फुट उंचीच्या कृत्रिम तलावात ४0 ते ५0 मूर्तींचे विसर्जन सहजतेने करता येते. ज्या मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत त्या बाजूला करून नंतर समुद्रात खोलवर विसर्जन करावे.
----------
सर्वांना त्यामध्येच निर्माल्य टाकण्याची
सक्ती करावी. जमा झालेल्या निर्माल्याचे उत्तम खत तयार करून गावातल्या शेतीसाठी, झाडांसाठी वापरावे. प्रत्येक विभागात कृत्रिम विहिरी तयार कराव्यात, म्हणजे त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही.
-------
ध्वनिप्रदूषणाचा त्रास वाढवण्याऐवजी लेजीमचे ग्रुप असावेत. प्रत्येक गल्लीमध्ये स्वतंत्र गणेशोत्सव मंडळ, त्यांचा स्वतंत्र ध्वनिक्षेपक यामुळे आवाजाची पातळी

90-110
डेसिबल्सच्या घरात जाते. जी

45-65
पर्यंत असायला हवी. किंबहुना त्यापेक्षाही कमी असावी.
--------
मदतीसाठी गृहरक्षक दलाचे २५0 जवान, ५४ वाहतूकरक्षक, राष्ट्रीय छात्र सेनेचे ४00 विद्यार्थी, जल सुरक्षा दलाचे ५00 स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे ९00 विद्यार्थी, सशस्त्र पोलीस दलाचे १00 जवान असतील.

Web Title: Take care of the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.