शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रक्तसाठा पुरेसा असला तरी गरजेनुसार शिबिरे घ्या, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 06:01 IST

शस्त्रक्रिया, प्रसुती, अपघातांवरील उपचारासाठी रक्ताची गरज सतत भासत असते. आता कोरोनानंतर रुग्णही उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत तर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.

मुंबई : सध्या राज्यात ५५ हजार युनिट, तर मुंबईत १२ ते १३ हजार युनिट रक्तसाठा उपलब्ध आहे. सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष आयाेजित करत असलेल्या रक्तदान शिबिरांमुळे समाधानकारक रक्तसाठा आहे. मात्र, रक्ताची गरज भासल्यास गरजेप्रमाणे शिबिरे घ्यावीत, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे.

शस्त्रक्रिया, प्रसुती, अपघातांवरील उपचारासाठी रक्ताची गरज सतत भासत असते. आता कोरोनानंतर रुग्णही उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत तर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. त्यामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासते. लॉकडाऊनमुळे कोणीच शहराबाहेर गेले नसून, अपघातांचे प्रमाण कमी आहे. राज्य सरकारकडून केलेल्या आवाहनानंतर राज्यासह मुंबईकर नागरिकांनी रक्तदान शिबिरांना चांगला प्रतिसाद दिला. 

सध्या राज्यातील वेगवेगळ्या रक्तपेढ्यांमध्ये ५५ हजार रक्त युनिट एवढा रक्तसाठा उपलब्ध असून, तो किमान जून महिन्यापर्यंत पुरेल इतकाच आहे. तर, मुंबईत १२ ते १३ हजार युनिट रक्तसाठा शिल्लक आहे. अजूनही बऱ्याचशा रक्तपेढ्या माहिती भरत नाहीत. रक्तसाठ्याचा आकडा वाढलेलाही असू शकतो, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले. सामाजिक संस्थांनी रक्त वाया जाणार नाही, याची काळजी घेत गरजेनुसार रक्तदान शिबिरांचे आयाेजन करावे, असे आवाहन डॉ. थोरात यांनी केले.

जून महिन्यापर्यंत पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक  - राज्यातील वेगवेगळ्या रक्तपेढ्यांमध्ये ५५ हजार रक्त युनिट एवढा रक्तसाठा उपलब्ध असून, तो किमान जून महिन्यापर्यंत पुरेल इतकाच आहे.- आता कोरोनानंतर रुग्णही उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत तर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. त्यामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासते. लॉकडाऊनमुळे कोणीच शहराबाहेर गेले नसून, अपघातांचे प्रमाण कमी आहे.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीMaharashtraमहाराष्ट्र