‘गोडसेचे स्मारक उभारणाऱ्यांवर कारवाई करा’

By Admin | Updated: May 22, 2017 00:34 IST2017-05-22T00:34:07+5:302017-05-22T00:34:07+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथूराम गोडसे हा राष्ट्रपुरुष नव्हे, तर हत्यारा आहे. हिंदू महासभेतर्फे कल्याणमधील सापड

Take action against those who raise Godse's memorial ' | ‘गोडसेचे स्मारक उभारणाऱ्यांवर कारवाई करा’

‘गोडसेचे स्मारक उभारणाऱ्यांवर कारवाई करा’

विरोधकांची मागणी : पुतळ्याला परवानगी नाही, शासनाची भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथूराम गोडसे हा राष्ट्रपुरुष नव्हे, तर हत्यारा आहे. हिंदू महासभेतर्फे कल्याणमधील सापड गावात खासगी ठिकाणी स्मारक उभारुन सशस्त्र प्रशिक्षण वर्ग चालविण्याचा डाव आहे. राज्य सरकारने त्याबाबत तातडीने लक्ष घालून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेत विरोधकांनी केली. त्यावर याबाबत चौकशी करुन सभागृहात माहिती सादर करण्याची हमी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
कॉँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत सापड गावात नथुराम गोडसे याचा पुतळा उभारला जात असल्याची माहिती सभागृहाला सादर केली.
गोडसेचे गोडवे गाणाऱ्यांकडून त्याचा पुतळा बांधण्यात येत असून अशा घटनांमुळे पुरोगामी राज्यावर डाग लागणार आहे. त्याला वेळीच आवर घातला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. धनंजय मुंडे, हेमंत टकले व दत्त यांनी केलेल्या टिकेमुळे अस्वस्थ झालेल्या भाजपा सदस्यांनी त्यांच्या भाषणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीवेळ गोंधळ निर्माण झाला.

Web Title: Take action against those who raise Godse's memorial '