शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

संत विचारधारेविरोधात वक्तव्य करणाऱ्याविरूध्द कारवाई करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 21:21 IST

समाजआरतीमध्ये ठराव; वारकरी सांप्रदायात प्रचंड नाराजी

वेळापूर - आषाढी पौर्णिमेनिमित्त विठ्ठलाची वारी सुरू असून या काळात वारकरी संप्रदाय विरुद्ध वक्तव्य करण्याचा प्रकार घडत आहे. याची गंभीर दखल वारकरी संप्रदायाने घेतली आहे. गुरूवारी वेळापूर येथे झालेल्या समाजआरती मध्ये यासंदर्भात एक ठराव घेऊन अशा व्यक्तींवर शासनाने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये दोन दिवसापूर्वी वारकरी संप्रदाय आणि संताविरुद्ध वक्तव्य करण्याचा प्रकार घडला होता. त्याचे तीव्र पडसाद लगेचच उमटल्यावर माफी मागून हा प्रकार निवळण्यात आला होता. एवढेच नाही तर, पुणे मुक्कामी भिडे गुरुजी यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यापेक्षा मनु श्रेष्ठ असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली होती. त्याचे तीव्र पडसाद समाजमनात उमटले होते. अशा घटनांची पुनरावृत्ती वारंवार व्हायला लागल्याने गंभीर दखल वारकरी संप्रदायाने घेतली आहे. वारकरी सांप्रदाय हा समताप्रधान आहे. जात , धर्म , पंथ याच्या पलिकडे जावून स्त्रीयांना सुध्दा अध्यात्मिक स्वातंत्र्य देत मानवतेची बीजे जनमानसात रुजविणारा आहे. हे सर्वज्ञात असून सुध्दा काही व्यक्तींकडून त्याचा विपर्यास करणारी विधाने गेल्या काही दिवसापासून होत असल्याची खंत गुरुवारी झालेल्या समाजआरतीत व्यक्त करण्यात आली. अशा प्रवृत्तीना पायबंध घालण्याची मागणी वारकरयांकडून आल्याने वारकरी सांप्रदायाने गंभीर दखल घेतली आहे . संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील समाज आरतीच्या वेळी झालेल्या ठरावात, संत आणि संत विचार या संदर्भात विपर्यस्त तसेच अवमानकारक लेखन , वक्तव्य करण्याचे प्रकार अलीकडील काळात वारंवार घडत असल्याने असे प्रकार करणाऱ्याना परिणामकारक शासन घडेल अशा प्रकारची कारवाई शासनाने करावी अशी मागणी समस्त पालखी सोहळ्यातील समाज व वारकरी सांप्रदायाच्या वतीने समाज आरतीच्या वेळी करण्यात आली आहे. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, संस्थानचे अध्यक्ष डॉ अभय टिळक, विश्वस्थ अजित कुलकर्णी, सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे पाटील, श्रीमंत शितोळे सरकार यांचे प्रतिनिधी, नामदेव महाराज वासकर, राणु महाराज वासकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष मारुती कोकाटे, वारकरी फडकरी दिंडी समाजाचे अध्यक्ष तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य ज्ञानेश्वर जळगावकर, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार यांच्यासह मानकरी, दिंडी प्रमुख व लाखो वारकरी उपस्थित होते. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSolapurसोलापूर