शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फोडाफोडीच्या राजकारणातून उसंत घेऊन जरांगेंच्या तब्येतीकडे लक्ष द्या; मनसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 12:15 IST

पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना ट्विट करून ही मागणी केली आहे

जालना -  MNS on Manoj Jarange Patil ( Marathi Newsमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. १० तारखेला सुरु झालेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यात राज्यात सध्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी आणि राज्यसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. यात मनसेने राज्य सरकारला टोला लगावला आहे. सरकारनं फोडाफोडीच्या राजकारणातून उसंत घ्यावी आणि जरांगेंच्या तब्येतीकडे लक्ष द्या अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. 

राजू पाटील यांनी ट्विट करून म्हटलंय की, मनोज जरांगेंची तब्येत ढासळत चालली आहे, अशावेळी सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन सर्वप्रथम जरांगेच्या तब्येतीची दखल घेणे गरजेचे आहे. कोण चूक व कोण बरोबर हे येणारा काळ ठरवेल परंतु सरकारने कोणाच्याही जीवाशी खेळू नये असं ठाम मत व्यक्त केले आहे. पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना ट्विट करून ही मागणी केली आहे.  आमदार राजू पाटील यांनी लोकमत वृत्तपत्राने छापलेल्या बातमीतील फोटोही ट्विटला जोडलेला आहे.  

जालनाच्या अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या प्रकृती ढासळताना पाहून उपस्थित ग्रामस्थ, महिला आणि लहान मुलांनीही त्यांना निदान पाणी तरी प्या अशी गळ घातली आहे. जरांगे-पाटील यांनी उपचार घेण्यासही नकार दिला. त्यांनी किमान पाणी तरी प्यावे, यासाठी महिलांसह ग्रामस्थांनीही विनवणी केली. परंतु, जरांगे त्यांनाही नकार दिला. विशेष म्हणजे, उपोषण स्थळाशेजारी राहणारी दीड वर्षीय काव्या या चिमुकलीनेही एक तास जरांगे-पाटील यांच्याजवळ बसून मनोजमामा, पाणी घ्या अशी विनवणी केली. 

दरम्यान,  मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत अतिशय खालावल्याने राज्यातील मराठा समाज चिंतेत आहे. आम्ही सर्वच नाही तर संपूर्ण समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व आपल्या विषयी समाजाच्या मनात कसली ही शंका नाही. यात चिंतेतून समाजातील विविध संघटनांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. आपणा शिवाय आम्हास कुणी वाली नाही, आरक्षणाची लढाई सुरूच राहिल, आपण औषधोपचार घ्यावेत असे आवाहन मराठा मेडीकोज, महाराष्ट्र राज्यने पत्राद्वारे  केले आहे.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMaratha Reservationमराठा आरक्षण